Ram Mandir | ‘राम मंदिर अपवित्र आहे, हिंदुंनी पूजा करु नये’, आमदाराच वादग्रस्त वक्तव्य

Ram Mandir | भव्य राम मंदिराला अपवित्र ठरवलय. कुठल्याही भारतीय हिंदूने अशा अपवित्र स्थळाची पूजा करु नये, असं त्यांनी म्हटलय. आमदाराच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झालाय.

Ram Mandir | 'राम मंदिर अपवित्र आहे, हिंदुंनी पूजा करु नये', आमदाराच वादग्रस्त वक्तव्य
Ram Mandir
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 9:46 AM

कोलकाता : राम मंदिराबद्दल एका आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याने राम मंदिराला अपवित्र स्थान म्हटलय. कुठल्याही हिंदूने पूजेसाठी राम मंदिरात जाऊ नये, असही या आमदाराने म्हटलं आहे. आमदाराच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. रामेंदु सिन्हा असं या आमदाराच नाव आहे. तारकेश्वर येथून येणारे ते तृणमुल काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. रामेंदु सिन्हा यांच्या वक्तव्याचा चहूबाजूंनी निषेध होतोय.

बंगाल भाजपाचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी रामेंदु सिन्हा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “या अपमानास्पद वक्तव्याची मी फक्त निंदा करत नाही, तर जगभरातील हिंदुंच्या भावना दुखावल्याबद्दल या व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवण्याची तयारी करत आहे” असं सुवेंदु अधिकारी यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर म्हटलय.

अजून काय म्हटलय?

“तृणमुल काँग्रेसचे नेते असेच आहेत. हिंदूंवर आक्रमण करण्याची त्यांची हिम्मत इतकी वाढली आहे की, आता ते भगवान श्री राम यांच्या भव्य मंदिराला अपवित्र ठरवत आहेत” अशा शब्दात सुवेंदु अधिकारी यांनी टीएमसीवर हल्लाबोल केला. तारकेश्वरचे आमदार रामेंदु सिन्हा रॉय यांनी भव्य राम मंदिराला अपवित्र ठरवलय. कुठल्याही भारतीय हिंदूने अशा अपवित्र स्थळाची पूजा करु नये, असं त्यांनी म्हटलय.

एफआयआर नोंदवणार

सुवेंदु अधिकारी म्हणाले की, मी त्यांच्या या अपमानास्पद वक्तव्याचा फक्त निषेधच करत नाही, तर जगभरातील हिंदुंच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवणार आहे. रामेंदु सिन्हा आरामबाग संघटनात्मक जिल्ह्याचे टीएमसी अध्यक्ष आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.