भारताच्या राफेलची पाकिस्तानच्या एअरफोर्सवर इतकी दहशत की, नाईलाजाने उचलाव लागलं हे पाऊल

Rafale Fighter Jet : काळाची पावलं ओळखून इंडियन एअर फोर्सने स्वत:मध्ये बदल केले आहेत. अत्याधुनिक घातक विमान आपल्या ताफ्यात आहेत. भारताच्या या वाढत्या ताकदीची पाकिस्तानला पुरेपूर कल्पना आहे. म्हणून पाकिस्तानी एअरफोर्सला नाईलाजाने एक पाऊल उचलावं लागलय.

भारताच्या राफेलची पाकिस्तानच्या एअरफोर्सवर इतकी दहशत की, नाईलाजाने उचलाव लागलं हे पाऊल
Rafale Fighter Jet Deal
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 3:42 PM

पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक झालाय. एअर स्ट्राइक झालाय. आता त्यांच्या मनात भिती आहे, इंडियन एअरफोर्सच्या राफेल फायटर जेटची. म्हणूनच पाकिस्तानने आपल्या फायटर पायलट्सना चीनच्या J-31 स्टेल्थ फायटर जेट्सच्या ट्रेनिंगसाठी पाठवलय. भविष्यात भारताने राफेलद्वारे हल्ला केल्यास त्याला प्रत्युत्तर देता यावं, यासाठी पाकिस्तानी आपल्या फायटर पायलट्सना अशी ट्रेनिंग देतोय. पाकिस्तानने आधीच चीनकडून J-10C फाइटर जेट्स, एडवांस राडार सिस्टम, मिसाइल्स विकत घेतले आहेत. एअरफोर्सला आधुनिक बनवण्यासाठी ही खरेदी केली आहे. दक्षिण आशियात संतुलन टिकवण्यासाठी चीनही पाकिस्तानची मदत करतोय.

पाकिस्तान चीनकडून JF-17 Block 3 फायटर जेट विकत घेतोय. भारत स्वदेशी तेजस, फ्रान्सकडून खरेदी केलेल्या राफेल आणि रशियन बनावटीच्या सुखोई-30 MKI वर अवलंबून आहे. पाकिस्तान सध्या आपल्या वैमानिकांना J-31 फायटर विमान उड्डाणाच ट्रेनिंग देत आहे. J-31 हे चीनच अत्याधुनिक स्टेल्थ फायटर विमान आहे. चीनने 2012 पासून 2019 पर्यंत J-31 च्या डिझाइनमध्ये अनेक बदल केले आहेत. या फायटर जेटपासून भारताला किती धोका आहे? या विमानाच वैशिष्ट्य काय? ते जाणून घेऊया.

या घातक फायटर जेटची किती नाव?

चीनच हे स्टेल्थ विमान वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. J-31, FC-31, शेनयांग एफसी-31 स्टेल्थ फायटर जेट, फॉल्कन हॉक किंवा स्नोवी आउल किंवा J-35. भारतात हे विमान J-31 म्हणून ओळखलं जातं. शेनयांग एयरक्राफ्ट कॉर्पोरेशनने या विमानाची निर्मिती केली आहे. 2012 साली या विमानाच पहिलं मॉडल दाखवण्यात आलं होतं. जे देश अमेरिकेने बनवलेलं F-35 स्टेल्थ जेट विकत घेऊ शकत नाहीत, ते आमच्याकडून J-31 विमान विकत घेऊ शकतात, असा चीनचा दावा आहे.

J-31 फायटर जेट किती घातक?

J-31 फायटर जेट 56.9 फुट लांब आहे. या विमानाची उंची 15.9 फुट आहे. प्रतितास 1400 km/hr वेगाने उड्डाण करु शकतं. राफेल फायटर जेट एक किंवा दोन पायलट उडवू शकतात. राफेलची लांबी 50.1 फुट आहे. हे 17.6 फुट उंच आहे. प्रतितास 1912 km/hr वेगाने हे विमान उड्डाण करु शकतं.

J-31 ची कॉम्बॅट रेंज शस्त्रांसह 1200 KM आहे. मध्येच इंधन मिळालं, तर ही रेंज 1900 km पर्यंत जाते. हे 52 हजार फूट उंचीवरुन उड्डाण करु शकतं.

राफेलची कॉम्बॅट रेंज 1850 किलोमीटर आहे. हे विमान 51,952 फुट उंचीवरुन उड्डाण करु शकतं. J-31 पेक्षा ही उंची थोडी कमी आहे. J-31 फायर जेटमध्ये हवेतून हवेत हल्ला करणारी 12 मिसाइल्स फिट करता येऊ शकतात. हवेतून जमिनीवर मारा करणारी 8 सुपरसॉनिक मिसाइल, 500 kg वजनाचे 8 डीप-पेनेट्रेशन बॉम्ब किंवा 30 लहान बॉम्ब फिट करता येऊ शकतात.

राफेल किती घातक?

राफेलमध्ये 14 हार्ड पॉइंट्स आहेत. यात एक 30 मिलिमीटरची ऑटोकॅनन आहे. जी प्रत्येक मिनिटाला 125 राऊंड गोळ्या डागू शकते. त्याशिवाय या विमानात हवेतून हवेत मारा करणारी MBDA MICA, Meteor, Magic 2 किंवा अस्त्र सारखी मिसाइल फिट करता येतात.

त्याशिवाय हवेतून जमिनीवर मारा करणारी अपाचे, स्टॉर्म शॅडो, ह्रॅमर, पेव वे बॉम्बची सीरीज, एस-30एल मिसाइल, मार्क 82 बॉम्ब तसच ASMP-A अणवस्त्र क्षेपणास्त्र फिट करता येऊ शकतं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.