Tomato Price : जागते रहो! टोमॅटो चोरीची भीती, रात्रभर शेतकऱ्यांचा खडा पहारा
Tomato Price : टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोला सोन्याचा भाव आला आहे. शेतकऱ्यांना टोमॅटोने मोठा फायदा मिळवून दिला. पण टोमॅटोचे दर भडकल्याने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर शेतात खडा पहारा द्यावा लागत आहे.
नवी दिल्ली : टोमॅटोमुळे किचनचे बजेट (Kitchen Budget) कोलमडले आहे. तर अनेक भाज्यांची चव बिघडली आहे. देशात टोमॅटोला सोन्याचा भाव आला आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने शेतात राखणदारी करावी लागत आहे. टोमॅटो चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना टोमॅटोने मोठा फायदा मिळवून दिला आहे. पण टोमॅटोचे दर (Tomato Price Today ) भडकल्याने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाच नाही तर रात्रभर खडा पहारा द्यावा लागत आहे. देशात दक्षिण आणि पश्चिम भागात टोमॅटोचे उत्पादन झाले आहे. नवीन पीक पण लवकरच हाती येणार आहे. वाढत्या किंमतींमुळे शेतामधून टोमॅटो चोरी जाण्याची भीती वाढली आहे.
किंमती भडकल्या दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या किंमती 25-30 रुपये किलो होत्या. आता या किंमती 150 ते 250 रुपये प्रति किलो आहे. तर काही ठिकाणी हा भाव 220-300 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. व्यापारी, दलाल हे जास्त नफा कमावत आहे. तर शेतकऱ्यांना पण यंदा चांगला भाव मिळाला आहे. पावसाने ओढ दिल्यास दक्षिण राज्यात सुद्धा टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
टोमॅटोच्या शेताला खडा पहारा दक्षिण आणि पश्चिम भारतात सध्या टोमॅटोचे उत्पादन सुरु आहे. पण वाढत्या किंमतींमुळे चोरट्यांनी थेट शेतातील टोमॅटो पळविण्याचा धडाका लावला आहे. कधी नव्हे ते पिकातून कमाई करण्याची संधी आली असताना चोरट्यांची वक्रदृष्टी टोमॅटो पिकावर पडली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिवसाच नाही तर रात्रभर शेताची राखणदारी करावी लागत आहे.
आंध्रसह कर्नाटकात जागते रहो महाराष्ट्र, आंध्र प्रदेशासह कर्नाटक राज्यातील अनेक शेतकऱ्यांना टोमॅटोने मोठा फायदा मिळवून दिला आहे. पण चोरीच्या घटना पाहता शेतकऱ्यांनी जागते रहो चा नारा द्यावा लागत आहे. रस्त्यावर आणि शेतात फेकून देण्यात येणाऱ्या टोमॅटोचे अचानकच नशीब पालटले आहे. टोमॅटो चोरी जाऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना घराच्या शेतात राखणदारी करावी लागत आहे.
लाठी-काठीसह विजेरी पण रात्रीच्यावेळी खडा पाहारा देण्यासाठी शेतकऱ्यांना सुरक्षेचे साहित्य सोबत ठेवावे लागत आहे. चोरांची चाहुल लागताच प्रकाशाच्या झोतात ते दिसावे म्हणून विजेरीचा वापर करण्यात येत आहे. काही शेतकरी सोबत लाठ्या-काठ्या ठेवत आहे. बाका प्रसंग आल्यास दोन हात कराता यावे, यासाठी ही तजवीज करण्यात येत आहे.
किंमती भडकल्या केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, टोमॅटोच्या किंमतीत गेल्या एका महिन्यात 326.13 टक्क्यांची वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे उत्तर भारतात भाजीपाल्याच्या किंमती, विशेषतः टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
दक्षिणेतील राज्यांत उत्पादन सध्या दक्षिणेतील राज्यातील उत्पादनावर किंमती अवलंबून आहेत. टोमॅटोचे उत्पादन देशात जवळपास सर्वच राज्यात घेण्यात येते. पश्चिमी आणि दक्षिणेतील राज्यात टोमॅटोचे उत्पादन जास्त होते. या भागात जवळपास 56 ते 58 टक्के उत्पादन घेण्यात येते. याभागात उत्पादन वाढले आहे. त्याचा फायदा उत्तर भारताला होणार आहे.