पाकिस्तानला झटका! भारताला हव्या असलेल्या लष्करच्या अतिरेक्याचा POK च्या मशिदीत ‘गेम’
कोणी आणि कसा गेम केला?. मुरीदकेमध्ये लष्कर-ए-तयबाचा तळ होता. रियाझ अहमद तिथून ऑपरेट करायचाय. अलीकडेच हा तळ रावळकोट येथे शिफ्ट झाला. प्रमुख दहशतवाद्याची हत्या होण्याची यावर्षात ही चौथी घटना आहे.
श्रीनगर : पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. भारतीय तपास यंत्रणा मागच्या काही दिवसांपासून एका दहशतवाद्याच्या मागावर होत्या. भारतीय यंत्रणांना हा दहशतवादी हवा होता. लष्कर-ए-तयबाचा हा कमांडर होता. शुक्रवारी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील रावलकोट येथील एका मशिदीत या दहशतवाद्याचा गेम झाला. रियाझ अहमद उर्फ अबू कासिम असं या दहशतवाद्याच नाव आहे. अज्ञात बंदुधाऱ्याने गोळी झाडून अबू कासिमची हत्या केली. रियाज अहमद कोटलीहून नमाज अदा करण्यासाठी म्हणून या मशिदीत आला होता. पॉइंट-ब्लँक रेंजमधून रियाजच्या डोक्यात गोळी झाडली.
1 जानेवारी रोजी धानग्री येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याच कारस्थान रचण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. राजौरी जिल्ह्यातील धानग्री गावात हा दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 7 लोक ठार झाले होते. 13 जण जखमी झाले होते. हे दहशतवादी गावात IED स्फोटक सोडून गेले होते. दुसऱ्यादिवशी सकाळी यामुळे एका मोठा स्फोट झाला होता. सीमेपलीकडून कारवाया करणाऱ्या प्रमुख दहशतवाद्याची हत्या होण्याची यावर्षात ही चौथी घटना आहे. रियाझ अहमद कुठून ऑपरेट करत होता?
रियाझ अहमद उर्फ अबू कासिम मूळचा जम्मूचा आहे. 1999 साली त्याने सीमा पार केली. पूँछ आणि राजौरी जिल्ह्यामध्ये दहशतवादाच पुनरुज्जीवन करण्यामागे त्याच डोकं होतं. अधिकाऱ्यांनी पीटीआयला ही माहिती दिली. मुरीदकेमध्ये लष्कर-ए-तयबाचा तळ होता. रियाझ अहमद तिथून ऑपरेट करायचाय. अलीकडेच हा तळ रावळकोट येथे शिफ्ट झाला. लष्कर-ए-तयबाचा टॉप कमांडर सज्जाद जाटचा तो जवळचा सहकारी होता. या दहशतवादी संघटनेची आर्थिक बाजूही तो संभाळायचा, असं अधिकाऱ्यांनी सांगितला.