बंगळुरू : नियम हे तर तोडण्यासाठीच असतात असं म्हणणाऱ्या अनेकांना तुम्ही पाहिलं असेलच. पण अशाच निष्काळजीपणामुळे मोठा आर्थिक फटका बसल्याच्याही अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याने एका दुचाकीस्वाराला त्याच्या बाईकच्या किंमतीपेक्षाही जास्त दंड (Fine) मोजावा लागला आहे. सोशल मीडियावर या घटनेची तुफान चर्चा सुरू आहे. (traffic police cut of 42500 challan for not wearing helmet in bengaluru)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळुरूमध्ये (Bengaluru) घडली आहे. हेल्मेट न घालता दुचाकी चालवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं जेव्हा पोलिसांनी त्याला स्कूटरच्या किंमतीपेक्षाही जास्त दंड वसूल करत चालान कापलं. वाहतुकीचा नियम मोडल्यामुळे हा दंड आकरण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
शुक्रवारी हेल्मेट न घालता वाहतूक पोलिसांकडून तरुणाला थांबवण्यात आलं. अरुण कुमार असं या व्यक्तिचं नाव आहे. पोलिसांनी जेव्हा त्याला 2 मीटर लांब चालानची पावती हातामध्ये दिली तेव्हा तरुणाला दंडाची रक्कम पाहून धक्काच बसला. ही रक्कम तरुणाच्या बाईकच्या किंमतीपेक्षाही जास्त होती असं त्याने सांगितलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, तरुणाला 42,500 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अरुणने सांगितले की हा दंड त्याच्या सेकंड हँड स्कूटरच्या किंमतीपेक्षा जास्त आहे. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण कुमारने 77 वेळा वाहतुकीचे नियम मोडले आहेत. त्यासाठी आता त्याला न्यायालयात 42,500 चालान भरावा लागणार आहे. यामुळे पोलिसांनी त्याची स्कूटर ताब्यात घेतली आहे.
इतर बातम्या –
बापरे! 50 फूल लांब अॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य
विवाहित प्रियकराकडून प्रेयसीचा खून, हत्येच्या थरारानं चंद्रपूरमध्ये खळबळ
VIDEO : Maratha Reservation | मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत सरकार लढणार : एकनाथ शिंदे @mieknathshinde pic.twitter.com/TzqzWSXy0v
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 1, 2020
(traffic police cut of 42500 challan for not wearing helmet in bengaluru)