‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’च्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण, लोककल्याणासाठी महायज्ञाचंही आयोजन

रामानुजाचार्य यांचा जन्म 1017 मध्ये तमिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे कांतीमाती आणि केसावाचार्युलू यांच्याकडे झाला. भक्तांचा असा विश्वास आहे की हा अवतार स्वतः देवाच्या आदेशानं घेतला आहे. त्यांचे शिक्षण कांची अद्वैत पंडितांच्या मार्गदर्शनाखाली वेदांत मध्ये झालं. त्यांनी विशिष्ठद्वैत विचारधारा स्पष्ट केली आणि मंदिरांना धर्माचे केंद्र बनवले.

'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'च्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण, लोककल्याणासाठी महायज्ञाचंही आयोजन
चिन्ना जियार स्वामींनी घेतली राष्ट्रपती कोविंद यांची भेट
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 7:33 AM

नवी दिल्ली : श्री रामानुजाचार्य स्वामींच्या (Sri Ramanujacharya Swami) 1000 व्या जन्म वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री रामानुज सहस्रब्दी’ (Sri Ramanuja Sahasrabdi) समारंभांचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. श्री रामानुजाचार्य अकराव्या शतकातील हिंदू धर्मशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. ते भक्ती चळवळीचे एकमेव सर्वात मोठे प्रेरक आणि सर्व मानव जातीच्या समानतेचे सुरुवातीचे समर्थक होते. (Tridandi Chinna Jiyar Swamy invites President Ramnath Kovind to inaugurate the Statue of Equality)

श्री रामानुजाचार्य स्वामी यांच्या आठवणी जागवण्यासाठी आणि सन्मानासाठी मोठ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हैदराबादजवळ शमशाबादमध्ये निर्मित एका मोठा आश्रमात त्यांच्या प्रतिमेच्या अभिषेकासह 1000 व्या वार्षीक सोहळ्याला सुरुवात होईल. स्वामींची 216 फूट उंच प्रतिमा बनवण्यात आली आहे, जी जगातील दुसरी सर्वाच उंच प्रतिमा आहे. रामानुजाचार्यांच्या सर्व भक्तांची आपल्या देवतांची पूजा करण्याच्या अधिकारांची रक्षा करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मूर्तीला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं संबोधलं जात आहे.

13 दिवसीय सोहळ्याचं उपराष्ट्रपतींना निमंत्रण

रामानुज संप्रदायाचे विद्यमान आध्यात्मिक प्रमुख त्रिदंडी चिन्ना जियार स्वामी यांनी 2 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2022 या कालावधीत नियोजित समारंभांविषयी माहिती देण्यासाठी मंगळवारी राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. यावेळी श्रीनिवास रामानुजम आणि माई होमचे चेअरमन डॉ. रामेश्वर रामही उपस्थित होते. तसंच चिन्ना जीयर स्वामी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचीही भेट घेतली. नायडू यांनाही 13 दिवसीय सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

त्रिदंडी चिन्ना जियार स्वामी यांच्यासह श्रीनिवास रामानुजम आणि माई होमचे चेअरमन डॉ. रामेश्वर राम राष्ट्रपतींच्या भेटीला

लोककल्याणासाठी महायज्ञाचं आयोजन

सहस्रहुंदात्माका लक्ष्मी नारायण यज्ञ लोककल्याणासाठी केला जाणार आहे. या मेगा इव्हेंटसाठी बांधण्यात आलेल्या 1,035 होम कुंडांमध्ये सुमारे दोन लाख किलो गाईचे तूप वापरण्यात येणार आहे. मुचिंतल येथील विस्तीर्ण आध्यात्मिक सुविधा “दिव्य साकेत” लवकरच जगप्रसिद्ध आध्यात्मिक ठिकाण म्हणून उदयास येईल. हे चिन्ना जीयर यांचे स्वप्न असल्याचं त्यांनी सांगितलं. तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च करून हा मेगा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुतळ्याच्या बांधकामात 1800 टन लोखंड वापरला आहे. तर उद्यानाभोवती 108 दिव्यदेश किंवा मंदिरे बांधलेली आहेत.

Chinna Jeeyar Swami also invited Vice President Venkaiah Naidu

त्रिदंडी चिन्ना जियार स्वामी यांच्याकडून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनाही निमंत्रण

रामानुजाचार्य कोण आहेत?

रामानुजाचार्य यांचा जन्म 1017 मध्ये तमिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे कांतीमाती आणि केसावाचार्युलू यांच्याकडे झाला. भक्तांचा असा विश्वास आहे की हा अवतार स्वतः देवाच्या आदेशानं घेतला आहे. त्यांचे शिक्षण कांची अद्वैत पंडितांच्या मार्गदर्शनाखाली वेदांत मध्ये झालं. त्यांनी विशिष्ठद्वैत विचारधारा स्पष्ट केली आणि मंदिरांना धर्माचे केंद्र बनवले. रामानुजांना यमुनाचार्यांनी वैष्णव दीक्षामध्ये प्रवेश दिला. त्यांचे आजोबा अलावंदरू हे श्रीरंगम वैष्णव मठाचे धर्मगुरू होते. ‘नंबी’ नारायणाने रामानुजाला मंत्र दीक्षाचा उपदेश केला. तिरुकोष्टियारूंनी ‘द्वैय मंत्रा’चे महत्त्व समजावून सांगितले आणि रामानुजम यांना मंत्राचं गुपीत राखण्यास सांगितलं. रामानुजाला वाटले की ‘मोक्ष’ हा काही लोकांपुरता मर्यादित राहू नये. त्यामुळे तो पुरुष आणि स्त्रियांना सारख्याच पवित्र मंत्राची घोषणा करण्यासाठी श्रीरंगम मंदिर गोपुरम वर चढला.

रामानुजाचार्य स्वामी यांनी दलित लोकांना उच्चभ्रूंच्या बरोबरीने वागले. त्यांनी समाजात अस्तित्वात असलेल्या अस्पृश्यता आणि इतर दुर्गुणांचा नायनाट केला. त्यांनी प्रत्येकाला देवाची उपासना करण्याचा समान विशेषाधिकार दिला. अस्पृश्य म्हणवल्या जाणाऱ्या लोकांना त्यांनी “तिरुकुलाथर” असं संबोधलं. याचा अर्थ “जन्माला आलेला देव” आणि त्यांना मंदिराच्या आत नेले. त्यांनी भक्ती चळवळीचे नेतृत्व केले तसंच तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला.

इतर बातम्या :

मोठी बातमी ! देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट, 6 संशयित ताब्यात, महाराष्ट्रही टार्गेटवर !

लोजपा खासदार रेप केसमध्ये ट्विस्ट, शरीर संबंध ठेवल्याची कबूली, 2 लाख रुपयेही दिले

Tridandi Chinna Jiyar Swamy invites President Ramnath Kovind to inaugurate the Statue of Equality

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.