Barabanki: गरम पाण्यावरून झालेल्या क्षुल्लक भांडणातून 16 वर्षांचा संसार संपुष्टात, पतीकडून पतीला तिहेरी तलाक

तिहेरी तलाक विरोधात कायदे कडक केल्यानंतरही ही प्रकरणे थांबताना दिसत नाहीत. या जोडप्याच्या लग्नाला 16 वर्षे झाली असून त्यांना पाच मुलेही आहेत. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Barabanki: गरम पाण्यावरून झालेल्या क्षुल्लक भांडणातून 16 वर्षांचा संसार संपुष्टात, पतीकडून पतीला तिहेरी तलाक
गरम पाण्यावरून झालेल्या क्षुल्लक भांडणातून 16 वर्षांचा संसार संपुष्टात
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 10:29 PM

बाराबंकी : तिहेरी तलाकचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पाणी गरम करण्यावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून पतीने पतीला तलाक दिल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे घडली आहे. तिहेरी तलाक विरोधात कायदे कडक केल्यानंतरही ही प्रकरणे थांबताना दिसत नाहीत. या जोडप्याच्या लग्नाला 16 वर्षे झाली असून त्यांना पाच मुलेही आहेत. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

जहांगीराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील सदरुद्दीनपूर गावात शमशुदुहा आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. शमशुदुहा आणि त्याचे कुटुंबीय लग्न झाल्यापासून तिचा छळ करीत असल्याचे पीडितेने पोलिसांना तक्रारीत म्हटले आहे. शमशुदुहाच्या लग्नाला 16 वर्षे झाली आहेत. या जोडप्याला पाच मुलेही आहेत. शमशुदुहाला त्याच्या पत्नीने औषधं घेण्यासाठी गरम पाणी दिले होते. यावर शमशुदुहाने तिला टोकले आणि आमचं पाणी आम्ही गरम घेऊ असे म्हटले. यावर त्याच्या पत्नीनेही त्याला प्रत्युत्तर देत ठीक आहे करा, असे म्हटले. एवढ्याशा क्षुल्लक कारणावरुन शमशुदुहा संतापला आणि त्याने आपल्या पत्नीला तिहेरी तलाक देत घराबाहेर काढले. तसेच सर्व मुलांना मारहाण केली.

पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहेत

पतीने तिहेरी तलाक दिल्यानंतर पीडितेने भावासह पोलीस स्टेशन गाठले आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस तहरीरच्या आधारे पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. पीडितेचे म्हणणे आहे की तिला लहान मुले आहेत. त्यांची काळजी घेणारे कोणी नाही. निकाह झाल्यापासून सासरचे लोक आपला छळ करीत आहेत. महिलेला एकूण पाच मुले असून सर्वात लहान मुलगा 2 वर्षाचा आहे. याप्रकरणी एसओ दर्शन यादव यांनी सांगितले की, एका महिलेने तिच्या पतीवर तिहेरी तलाक दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. (A 16-year-old’s life ended with a trivial quarrel over hot water)

इतर बातम्या

Palghar | एमबीबीएसची विद्यार्थिनी सदिच्छा साने अद्याप बेपत्ताच, 21 उलटले तरी तरुणीचा शोध पोलिसांना अपयश

Pune crime| पुण्यात टेकडीवर फिरायला गेलेल्या प्रेम युगलासोबत घडले असे काही की….

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.