केजरीवाल यांच्यानंतर विरोधी पक्षाची महिला खासदार अडचणीत येण्याची शक्यता

अंमलबजावणी संचालनालयाने TMC नेते महुआ मोईत्रा यांच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी कायदा म्हणजेच PMLA कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढू शकतात. महुआ यांच्यावर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप आहे.

केजरीवाल यांच्यानंतर विरोधी पक्षाची महिला खासदार अडचणीत येण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 7:47 PM

ईडीकडून अरविंद केजरीवाल यांना अटक झाली असतानाच आता आणखी एका विरोधी पक्षाच्या खासदारावर अटकेची टांगती तलवार आहे. टीएमसी नेत्या आणि माजी खासदार महुआ मोइत्रा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध पीएमएलए म्हणजेच भ्रष्टाचारविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. महुआ मोइत्रा यांच्यावर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. हे प्रकरण आता आणखीच तापू शकते. कारण महुआ यांच्यावर कारवाई होऊ शकते.

सीबीआय आणि ईडीकडून चौकशी

संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या आरोपावरून सीबीआय या प्रकरणात आधीच तपास करत आहे. आता या प्रकरणात ईडीची एन्ट्री झाली आहे. लोकपालच्या आदेशानंतर सीबीआयने तपास सुरू केला होता. ईडीने आधीच फेमा अंतर्गत महुआविरुद्ध तपास करत आहे. फेमा अंतर्गत ईडी महुआ यांची चौकशी करणार आहे.

डिसेंबर 2023 मध्ये महुआ मोईत्रा यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यांचं लोकसभेतून निलंबित करण्यात आल होते. भाजप नेते निशिकांत दुबे यांनी महुआवर गंभीर आरोप केले होते. महुआ यांना संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात आलिशान भेटवस्तू आणि पैसे घेतल्याचा आरोप भाजप नेत्याने केला होता. महुआ यांनी व्यावसायिक दर्शन हिरानंदानीसाठी काम केले आणि त्याबदल्यात पैसे घेतले असा आरोप करण्यात आला होता.

निशिकांत दुबे यांनी आरोप केल्यानंतर भाजपने महुआ यांच्याविरोधात जोरदार टीका केली होती. महुआ यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी भाजपने केली होती. नंतर तपासात ते दोषी आढळल्यानंतर महुआ यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. महुआ यांचा सरकारी बंगलाही खाली करण्यात आला होता.

महुआ मोईत्रा लोकसभा निवडणूक लढवत आहेत

TMC नेत्या महुआ मोईत्रा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. महुआ पश्चिम बंगालमधील कृष्णनगर मतदारसंघातून टीएमसीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. राजमाता अमृता रॉय भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महुआ यांनी भाजपच्या कल्याण चौबे यांचा पराभव केला. होता मात्र यंदा त्यांना राजमाता यांच्याकडून कडवं आव्हान मिळू शकतं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.