मोठा अपघात | ट्रकचे टायर फाटले, तीन बसेवर ट्रक आदळला, १५ जणांचा मृत्यू

सिमेंटच्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन बसेसला धडक दिली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला. तसेच 50 जण जखमी झाले आहे. त्यातील 10 जणांची प्रकृती गंभीर आहे.

मोठा अपघात | ट्रकचे टायर फाटले, तीन बसेवर ट्रक आदळला, १५ जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशात झालेल्या अपघातातील बस
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 10:46 AM

भोपाळ : मध्य प्रदेशात मोठा अपघात (truck and bus accident) झाला आहे. रीवा आणि सतना जिल्ह्यांच्या सीमेवर शुक्रवारी एका सिमेंटच्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन बसेसला धडक दिली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला. तसेच 50 जण जखमी झाले आहे. त्यातील 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. बरखडा गावाजवळील बोगद्याच्या बाहेर शुक्रवारी रात्री हा अपघात झाला आहे. बसमधील प्रवासी सतना शहरातील ‘कोल महाकुंभ’ मधून परतत होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची चौकशी केली. जखमींना सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मध्य प्रदेशातील सिधी येथील चुरहट-रीवा राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 15 बस प्रवाशांचा मृत्यू झाला. 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतरांच्या रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात 50 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. अनियंत्रित ट्रकने मागून उभ्या असलेल्या तीन बसेसला धडक दिली.

हे सुद्धा वाचा

महाकुंभात गेले होते

सतना येथे आयोजित कोल समाजाच्या महाकुंभात सहभागी होऊन या बसेस परतत येत होत्या. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह देखील सहभागी झाले होते. अपघात झाला त्यावेळी शिवराजसिंह चौहान सिधीमध्ये होते. माहिती मिळताच त्यांनी बडखरा गाव गाठले.

दोन बसेस दरीत कोसळल्या

रात्री ९ वाजता मोहनिया बोगद्यापासून काही अंतरावर हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. येथे भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोन बस 10 फूट खोल दरीत कोसळल्या. महामार्गावरच एक बस उलटली. ट्रक सिमेंटने भरलेला होता, धडकेनंतर उलटला.

जखमींना 2 लाख रुपये

गंभीर जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये तर सामान्य जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत. मृतांच्या नातेवाईकांनाही अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ट्रकने बसेसला मागून धडक दिली आणि त्यातील एक पलटी होऊन खड्ड्यात पडला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.