सर्वात मोठी दुर्घटना…बोगद्यात भूस्खलन, 36 मजूर अडकले; पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा

ब्राह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारा ते डंडालगांवपर्यंत नवयुगा कंपनीमार्फत बोगदा खणण्याचे काम सुरु असताना अचानक भूस्खंलन होऊन 50 मीटरचा बोगद्याचा भाग आत कोसळला. त्यामुळे काम करणारे 36 मजूर आत अडकले आहेत.

सर्वात मोठी दुर्घटना...बोगद्यात भूस्खलन, 36 मजूर अडकले; पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा
uttarkashi tunnel collapseImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 12, 2023 | 1:41 PM

उत्तराखंड | 12 नोव्हेंबर 2023 : उत्तराखंडातील उत्तरकाशीत यमुनोत्री महामार्गावर सिलक्यारा ते डंडालगांव पर्यंच्या भुयारी मार्गाचे काम सुरु असताना बोगद्याचा आतील भाग शनिवारी रात्री अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बांधकाम सुरु असलेल्या बोगद्याचा 50 मीटरचा भाग कोसळल्याने आत सुमारे 36 मजूर अडकले असून त्यांना काढण्यासाठी बचावपथक कामाला लागले आहे. या बोगद्यात पाईपद्वारे ऑक्सीजन पोहचविण्याचे काम सुरु आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

ब्राह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारा ते डंडालगांवपर्यंत नवयुगा कंपनीमार्फत बोगदा खणण्याचे काम सुरु असताना अचानक भूस्खंलन होऊन 50 मीटरचा बोगद्याचा भाग आत कोसळला. त्यामुळे काम करणारे 36 मजूर आत अडकले आहेत. या मजूरांना बाहेर काढण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. उत्तरकाशी पोलिस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी सांगितले की बोगद्यात अडकलेले सर्व मजूर सुरक्षित आहे. त्यांच्याकडे ऑक्सीजनचे सिलेंडर देखील आहे. तसेच एक ऑक्सीजनचा पाईप देखील आत सोडण्यात आला आहे. त्यातून ऑक्सीजन पुरविण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली एसडीआरएफ. एनडीआरएफ, फायर सर्व्हीस, 108 इर्मजन्सी सेवेचे कर्मचारी बचाव कामासाठी जुंपण्यात आले आहेत. बोगद्याचा तुटलेला हिस्सा हटविण्यासाठी व्हर्टीकल ड्रीलिंग मशिनचा वापर केला जात आहे. बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात NHIDCL या संस्थेच्या मशिनरी देखील काम करीत आहेत. बोगद्याच्या बाहेर पाच एम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मजूरांवर तातडीने वैद्यकीय मदत पुरविणे शक्य होणार आहे. सिलक्याराच्या दिशेला मुख्या प्रवेशद्वार पासून 200 मीटरवर हा बोगदा कोसळला आहे. तर बोगद्यात काम करणारे मजूर 2800 मीटर आतमध्ये काम करीत होते.

मार्चमध्येही बांधकाम कोसळले होते

हा बोगदा ऑल वेदर रोड प्रोजेक्टचा एक भाग आहे. याची लांबी 4.5 किमी आहे. चार किमीच्या बोगद्याचे काम झाले आहे. आधी या बोगद्याचे काम सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार होते. परंतू प्रकल्पाला उशीर झाला आहे. आता हा बोगदा मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. याच वर्षी मार्च महिन्यात देखील बांधकाम सुरु असतानाही दरड कोसळल्याचा प्रकार घडला होता.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....