TV9 च्या Dare2Dream च्या पुरस्कार वितरणाला उद्यापासून सुरुवात, कोणत्या शहरात कधी होणार सोहळा?

हा पुरस्कार वितरण सोहळा 30 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता संपन्न होणार आहे. टीव्ही 9 भारतवर्षच्या (TV9 Bharatvarsh) फेसबूक पेजवरुन या सोहळ्याचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. आत्मनिर्भर भारतासाठी योगदान देणाऱ्या या कंपन्यांचा देशातील विविध शहरात पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. 

TV9 च्या Dare2Dream च्या पुरस्कार वितरणाला उद्यापासून सुरुवात, कोणत्या शहरात कधी होणार सोहळा?
डेअर टू ड्रीम पुरस्कार वितरण सोहळा
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 9:47 PM

मुंबई : टीव्ही 9 नेटवर्क (TV9 Network) आणि सॅप इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगातील उद्योजकांना डेअर टू ड्रीम (Dare2Dream) पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा 30 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता संपन्न होणार आहे. टीव्ही 9 भारतवर्षच्या (TV9 Bharatvarsh) फेसबूक पेजवरुन या सोहळ्याचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. आत्मनिर्भर भारतासाठी योगदान देणाऱ्या या कंपन्यांचा देशातील विविध शहरात पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.

कोणत्या शहरात किती तारखेला पुरस्कार वितरण सोहळा ?

दिल्ली : मंगळवार, 30 नोव्हेंबर, दुपारी 1 वाजता मुंबई : बुधवार, 1 डिसेंबर, दुपारी 3 वाजता अहमदाबाद : गुरुवार, 2 डिसेंबर, दुपारी 3 वाजता हैदराबाद : शुक्रवार, 3 डिसेंबर, दुपारी 3 वाजता बंगळुरू : मंगळवार, 7 डिसेंबर, दुपारी 3 वाजता चेन्नई : बुधवार, 8 डिसेंबर, दुपारी 3 वाजता रेस्ट ऑफ नॉर्थ : गुरुवार, 9 डिसेंबर, दुपारी 3 वाजता कोलकाता : शुक्रवार, 10 डिसेंबर, दुपारी 3 वाजता

MSME मंत्रालयाचे सचिव बी.बी. स्वॅईन मार्गदर्शन करणार

भारताच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सचिव बी. बी. स्वॅईन या सोहळ्यात प्रमुख पाहुणे असतील. या सोहळ्यामध्ये ते बीजभाषण करणार असून उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. टीव्ही 9 नेटवर्कच्या टीव्ही 9 भारतवर्ष या वृत्तवाहिनीवरुन याचं प्रसारण करण्यात येणार आहे.

लघू उद्योजकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार

एमसएमई क्षेत्र सेवा आणि उत्पादन या दोन्ही क्षेत्रांमध्ये भरीव रोजगार निर्मिती करून भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे नेतृत्व करत आहे. भारतातील स्वदेशी उद्योगांच्या योगदानाबद्दल त्यांना प्रोत्साहन देण्याची आत्मनिर्भर भारत अभियानाला पुढं घेऊन जाण्यासाठी टीव्ही 9 नेटवर्क आणि सॅप इंडिया यांच्याकडून डेअर टू ड्रीम पुरस्कार देण्यात येत आहेत.

पुरस्कारांचे विभाग (दोन विभागांमध्ये 15 कॅटेगरीमध्ये पुरस्कार दिले जातील)

  • 75 कोटी ते 150 कोटी रुपयांच्या दरम्यान वार्षिक उलाढाल असलेले उद्योग
  • 150 कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल असलेला मिड-कॉर्पोरेट विभाग

कॅटेगरी

  • कंपनी ऑफ द इयर – क्षेत्रीय पुरस्कार (प्रत्येक विभागातील 8 ते 9 पुरस्कार)
  • वर्षभरातील उदयोन्मुख कंपनी
  • तंत्रज्ञानाद्वारे व्यवसाय परिवर्तन

प्रेरणादायी नेता

  • तरुण व्यावसायिक नेता
  • वर्षातील महिला उद्योजक
  • वर्षातील व्यावसायिक व्यक्ती

इतर बातम्या :

‘मंत्र्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार हे चुकीचंच’, बच्चू कडूंचा घरचा आहेर

विदेशातून येणाऱ्या विमानांवर बंदी घालावी, देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांवरही लक्ष ठेवण्याची गरज : राजेश टोपे

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.