टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाला केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गजांची हजेरी, देवीचं घेतलं दर्शन
टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. आज तिसऱ्या दिवशी महाअष्टमीचं आयोजन करण्यात आलं होतं. टीवी9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास आणि न्यूज डायरेक्टर हेमंत शर्मा यांनी संधी पूजा आणि भोग आरती केली. आज तिसऱ्या दिवशीही या फेस्टिव्हलला दिग्गजांनी हजेरी लावली आहे. केंद्रीय मंत्र्यांसहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या फेस्टिव्हलला हजेरी लावली.
दुर्गा पूजेच्या पर्वावर टीव्ही9 नेटवर्कने फेस्टिव्हल ऑफ इंडियाचं आयोजन केलं आहे. दरवर्षी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये हा फेस्टिव्हल होत असतो. पाच दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलचा आज तिसरा दिवस होता. फेस्टिव्हलमध्ये कला, संस्कृती आणि राजकारणातील दिग्गजांनी हजेरी लावली. केंद्रीय मंत्र्यांनीही या महोत्सवाला भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं.
फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये देशातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशिवाय भाजप नेते तरुण चुघ यांनीही या महाफेस्टिव्हलला हजेरी लावली.
या महोत्सवात खाद्यपदार्थांची रेलचेल होतीच. शिवाय मनोरंजनाचा खजिनाही होता. आज तिसऱ्या दिवशीही फेस्टिव्हलमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आजही पूजेनंतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले.
फेस्टिव्हलमध्ये आता दांडिया आणि गरबा नाईट सुरू झाली आहे. त्याशिवाय ढाक आणि धुनुची नृत्य स्पर्धाही होणार आहे. रात्री 9.30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे.
नवरात्रीच्या पर्वावर सुरू झालेल्या या फेस्टिव्हलमध्ये 250 हून अधिक स्टॉल लावण्यात आले आहेत. अनेक देशांच्या व्यापाऱ्यांनी हे स्टॉल लावले आहेत. फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रदर्शन भरवण्यात आले आहेत. तसेच अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थही या फेस्टिव्हलमध्ये ठेवण्यात आले आहेत.
या फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड संगीतापासून ते सुफी संगीतापर्यंतची मेजवाणी असणार आहे. त्यामुळे संगीतप्रेमींना एकाचवेळी दोन्ही प्रकारचं संगीत ऐकण्याची पर्वणीच लाभणार आहे. टीव्ही9 नेटवर्कने आयोजित केलेला फेस्टिव्हल ऑफ इंडिया 13 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.