अविस्मरणीय, जबरदस्त आणि उत्सुकता लावणारा… ‘टीव्ही9 महोत्सवा’ची उद्यापासून दणक्यात सुरुवात
तब्बल 250 हून अधिक रंगीबिरेंगी स्टॉल, आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शने, तोंडाला पाणी सुटेल अशा खाद्यपदार्थांची रेलच, लाईव्ह संगीताचा थरार आणि बरेच काही! टीव्ही९ इंडिया फेस्टिवल हा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचा उत्साही उत्सव आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा संगम घडवून आणणारा हा उत्सव आहे. हा पाच दिवसांचा उत्सव एक अविस्मरणीय अनुभव देणारा आहे. त्यामुळे या सांस्कृतिक कार्निव्हलमध्ये या आणि स्वतःला हरपून जा!
ज्या क्षणाची सर्वांना अतूरता लागली होती, त्याची प्रतिक्षा आता संपली आहे. टीव्ही9 भारत महोत्सव उद्यापासून दणक्यात सुरू होत आहे. टीव्ही9 भारत महोत्सवाचं हे दुसरं वर्ष आहे. यंदा हा महोत्सव 9 ते 13 ऑक्टोबर असा पाच दिवस चालणार आहे. नवी दिल्लीतील इंडिया गेटजवळील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये हा महोत्सव रंगणार आहे. या पाच दिवसात मनोरंजक अनुभवण्यासाठी, लाइव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी आणि असंख्य अविस्मरणीय क्षणांचा ठेवा गाठीला बांधून घेण्यासाठी या फेस्टिव्हलला जरूर भेट द्या.
गेल्यावर्षी टीव्ही9 भारत महोत्सवाने संपूर्ण शहरात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आज पुन्हा या महोत्सवाचे दणक्यात पुनरागमन झालंय. टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया पुन्हा एका दिल्लीत सर्वात मोठ्या पूजा मंडपाचं आयोजन करणार आहे. त्यात दुर्गा पूजेचं सार आणि महिमेचं प्रतिबिंब असणार आहे. उचंच उंच मूर्त्या, जिवंत देखावा आणि भारावून टाकणारं संगीत तुम्हाला अत्यंत प्रिय असणाऱ्या उत्सवाची प्रामाणिक भावना देऊन जाईल. पण हे केवळ पंरपरेच्या बाबत नाहीये. या वर्षी हा उत्सव विविध संस्कृतींच्या संगमाने आणि अद्वितीय खरेदी अनुभवाने उत्साह वाढवणार आहे. विविध देशातील 250 स्टॉलसह आपल्याला उच्च दर्जाचे फॅशन आणि सौंदर्य उत्पादनांपासून ते घरातील उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचरपर्यंत सर्व काही मिळणार आहे. आपण स्टाइलिश कपडे शोधत असाल किंवा आपल्या लिविंग रूममध्ये जीवंतता आणण्यासाठी अनोखी सजावट शोधत असाल, तर हा उत्सव तुमच्यासाठीचा एक स्टॉपच आहे असं समजा.
बंगाली मिठाई ते हैदराबादी बिर्याणी…
आणि तिथे खमंग पदार्थ आहेत. खाण्याच्या शौकिनांनों, या महोत्सवात विविध प्रादेशिक पदार्थांवर ताव मारण्यासाठी सज्ज व्हा. दिल्लीतील मसालेदार स्ट्रीट फूडपासून लखनऊच्या मक्खनवाले कबाबपर्यंत, बंगाली मिठाईपासून ते हैदराबादी बिरयानीपर्यंत, भारताच्या प्रत्येक कानकोपऱ्याचं प्रतिनिधित्व करणारा हा महोत्सव आहे. या खाद्यपदार्थांचा सुंगधच तुमच्या तोंडाला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही.
सुफी संगीत ते दणणाट…
संगीतप्रेमींसाठीही बरचं काही असणार आहे. सुफी संगीतापासून ते बॉलिवूड गाणी, लोकसंगीतासह ठेका धरायला लावणाऱ्या संगीताची मेजवाणी असणार आहे. संध्याकाळी तर देशातील काही प्रतिभावंत गायक स्टेजवर कल्लाच करणार आहेत. संगीतप्रेमींसाठी ही मोठी पर्वणीच असणार आहे.
यायलाच लागतंय…
त्यामुळे या अनोख्या, अविस्मरणीय आणि प्रचंड जल्लोष असलेल्या कार्यक्रमात तुमच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींसह उपस्थित राहा. नवी दिल्लीच्या ध्यानचंद स्टेडियमवर 9 ते 13 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. आध्यात्मिक वातावरण, खरेदीची धम्माल, स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल आणि संगीत… TV9 इंडिया फेस्टिवल प्रत्येकासाठी काहीतरी विशेष देणार आहे.
महोत्सवाची माहिती :
– कार्यक्रम : TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया – तारीख : 9 ते 13 ऑक्टोबर, 2024 – स्थळ : मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम, इंडिया गेटजवळ, नवी दिल्ली – वेळ : सकाळी 10:00 ते रात्री 10:00 वाजेपर्यंत