टीव्ही9 फेस्टिव्हलची दणक्यात सुरुवात; दिल्लीकरांसाठी पाच दिवस मोठी पर्वणी

दुर्गा पूजेच्या निमित्ताने टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाची सुरुवात झाली आहे. भारतातील सर्वात मोठ्या लाइफस्टाईल एक्सपोचं आयोजन दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये सुरू झालं आहे.

टीव्ही9 फेस्टिव्हलची दणक्यात सुरुवात; दिल्लीकरांसाठी पाच दिवस मोठी पर्वणी
TV9 Festival of India
Follow us
| Updated on: Oct 09, 2024 | 1:04 PM

दुर्गा पूजेच्या निमित्ताने टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाची सुरुवात झाली आहे. भारतातील सर्वात मोठ्या लाइफस्टाईल एक्सपोचं आयोजन दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये सुरू झालं आहे. या कार्यक्रमात अनेक देशांचे स्टॉल लागले आहेत. TV9 नेटवर्कचा हा बहुचर्चित फेस्टिव्हल येत्या 13 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी टीव्ही9 नेटवर्कचे न्यूज डायरेक्टर हेमंत शर्मा उपस्थित होते.

TV9 Festival of India

TV9 Festival of India

टीव्ही9 नेटवर्कचे न्यूज डायरेक्टर हेमंत शर्मा यांनी या पावन प्रसंगी आपली भावना व्यक्त केली आहे. दुर्गा पूजा शक्तीला साधण्याचा उत्सव आहे. आणि आपण लोककल्याणासाठीच शक्तीचा आराधना करतो. टीव्ही9 नेटवर्क लोककल्याणचं काम करत आहे. दुर्गा पूजेचा आणखी एक अर्थ आहे. आपण मातृ शक्तीचं सामर्थ्य, स्वाभिमानाची सार्वजनिक याचना करतो. टीव्ही9 नेटवर्क देशातील सर्वात मोठं नेटवर्क आहे. संपूर्ण देशात टीव्ही9 नेटवर्कची फुटप्रिंट तुम्हाला मिळेल. प्रत्येक भाषेत मिळेल. या उत्सवात संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व पाहायला मिळेल. संपूर्ण देशाची संस्कृती हातात हात घालून चालताना दिसेल, आम्ही तेच जपण्याचं काम करत आहोत, असं टीव्ही9 नेटवर्कचे न्यूज डायरेक्टर हेमंत शर्मा यांनी सांगितलं.

TV9 Festival of India

TV9 Festival of India

13 ऑक्टोबरपर्यंत महोत्सव

टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया उत्साह, सांस्कृतिक वैविध्य आणि उत्सवासाठी साजरा केला जातो. 9 ते 13 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे पाच दिवस हा उत्सव चालणार आहे. दिल्लीच्या इंडिया गेटजवळील प्रसिद्ध मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये या उत्सवाचा आनंद लुटता येणार आहे. या उत्सवातून लाइव्ह परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. संगीत आणि खाद्यपदार्थांची मेजवाणी असणार आहे. दिल्लीकरांसह आजूबाजूच्या राज्यातील कला, संगीत आणि खाद्यप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणीच असणार आहे.

TV9 Festival of India

TV9 Festival of India

या पाच दिवसात दिल्लीकरांना वैश्विक लाइफस्टाईलही पाहता येणार आहे. उत्सवात मनाजोगती खरेदी करता येणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन पाहता येणार आहे. रुचकर पदार्थांवर ताव मारता येणार आहे. संगीताचा अनोखा आनंद घेता येणार आहे. तसेच 250 हून अधिक देशातील स्टॉलवर जाऊन जगभरातील गोष्टी खरेदी करता येणार आहेत. गेल्यावर्षी या उत्सवाने दिल्लीकरांची मने जिंकली होती. त्यामुळे दिल्लीकर या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे यंदाही हा महोत्सव दिल्लीकरांसाठी खास असाच ठरणार आहे.

TV9 Festival of India

TV9 Festival of India

असा असेल कार्यक्रम

9 ऑक्टोबर (महाषष्ठी): देवी बोधन आणि पंडालचे रात्री 8:00 वाजता उद्घाटन

10 ऑक्टोबर (महासप्तमी): नवपत्रिका प्रवेश, चक्षुदान आरती आणि पुष्पांजलीसह पूजेचं आयोजन

11 ऑक्टोबर (महाअष्टमी): सोंधी पूजा आणि भोग आरती.

12 ऑक्टोबर (महानवमी): नवमी पूजा आणि प्रसाद वितरण.

13 ऑक्टोबर (विजयादशमी): महोत्सवाचा समारोप सिंदूर खेला आणि देवी पूजेसह

TV9 Festival of India

TV9 Festival of India

संगीतप्रेमींसाठी लाइव्ह म्युझिकची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती थिरकल्याशिवाय राहणार नाही. बॉलिवूडच नाही तर सुफी संगीताचाही अस्वाद संगीतप्रेमींना घेता येणार आहे. या महोत्सवात सर्व काही असणार आहे. मंचावर देशातील प्रतिभावंत कलाकार आपल्या कला आणि संस्कृतीचं प्रदर्शन करून हा महोत्सव अविस्मरणीय असाच करणार आहेत.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.