टीव्ही9च्या फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये दांडिया आणि गरब्याचा धुमाकूळ… आजही कार्यक्रमांची रेलचेल

TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशीही या फेस्टिव्हलला लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. उद्या दसरा असल्याने आज खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे. पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी या ठिकाणी झाली आहे. आजही दिल्लीकरांसाठी या फेस्टिव्हलमध्ये रंगारंग कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

टीव्ही9च्या फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये दांडिया आणि गरब्याचा धुमाकूळ... आजही कार्यक्रमांची रेलचेल
TV9 Festival of IndiaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 1:26 PM

नवरात्रीच्या पर्वावर दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया सुरू झाला आहे. आज या फेस्टिव्हलचा तिसरा दिवस आहे. पाच दिवस हा फेस्टिव्हल चालणार आहे. गेल्या तीन दिवसात हजारो लोकांनी या फेस्टिव्हलला हजेरी लावली आहे. या काळात हजारो रुपयांची उलाढालही झाली आहे. स्टॉलधारकांचा चांगलाच आर्थिक नफा झाला आहे. तर ग्राहकांना अत्यंत महत्त्वाच्या देशविदेशातील दुर्मीळ वस्तू घेता आल्या आहेत. तसेच नानाविध पदार्थांवर तावही मारता आला आहे. आज फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी संधी पूजा आणि भोग आरतीसह महा अष्टमी साजरी केली जाणार आहे.

महा अष्टमीचा दिवस भक्तांसाठी अत्यंत खास आहे. कारण आजच्या दिवशी संधी पूजा केली जाते. ही पूजा नवरात्रीची अष्टमी आणि नवमीच्या दरम्यान केली जाते. संधी पूजा अष्टमी तिथीचं संपणं आणि नवमी तिथी सुरू होत असताना केली जाते. या पाच दिवसात फेस्टिव्हलमध्ये अनेक गोष्टी आकर्षणाच्या असणार आहेत.

संधी पूजेनंतर भोग आरती

फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये संधी पूजेनंतर भोग आरती करण्यात येणार आहे. माँ दुर्गेला स्वादिष्ट भोजनाचा भोग लावला जाणार आहे. हा भोग कृतज्ञता आणि भक्तीचं प्रतिक मानला जातो. या दिवशी प्रत्येकाच्या मनात गहन अध्यात्मिक उत्साह असतो. त्यात भक्त देवीला सन्मानित करण्यासाठी प्रार्थना, अनुष्ठान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सहभागी होतात. टीव्ही9च्या फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये आज दिवसभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. संध्याकाळी दांडिया आणि गरबा नाईटच्याशिवाय ढाक आणि धुनुची नृत्य स्पर्धाही होणार आहे.

TV9 Festival of India

TV9 Festival of India

दांडिया/गरबा नाईट: आज संध्याकाली 6:30 वाजता दांडिया आणि गरबा नाईटचं आयोजन होणार आहे. या दरम्यान पारंपरिक नृत्य आणि अप्रतिम संगीत प्रत्येकाचं मन मोहून घेणार आहे.

ढाक आणि धुनुची नृत्य स्पर्धा : रात्री 8 ते 9:30 वाजेपर्यंत एका आणखी संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

250 हून अधिक स्टॉल

टीवी9 के फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या मेगा लाइफस्टाइल एक्सपोमध्ये अनेक देशांचे 250 हून अधिक स्टॉल लागले आहेत. TV9 नेटवर्कने आयोजित केलेला हा भव्य फेस्टिव्हल 13 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडियात ग्लोबल लाइफस्टाईलच्या ट्रेंडसची तुम्हाला ओळख होईल. तसेच या ठिकाणी तुम्ही अनेक अॅक्टिव्हिटीजचा आनंद लुटू शकता. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रदर्शने भरली आहेत. तसेच खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. या ठिकाणी प्रत्येकासाठी काही ना काही आहेच. 250 हून अधिक स्टॉल लागले आहेत. फॅशनपासून ते घरातील सजावटीच्या सामानापर्यंत, औषधांपासून ते कपड्यांपर्यंत आणि खाद्यपदार्थांपासून संगीत रजनीपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश या फेस्टिव्हलमध्ये आहे.

एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.