TV9 Global Summit 2022 Live: देशाला युनिफॉर्म सिव्हिल कोड ची गरज नाही : ओवेसी

| Updated on: Jun 17, 2022 | 6:32 PM

What India Thinks Today Global Summit Live Updates: भारताचे नंबर वन टीव्ही नेटवर्क टीव्ही 9 च्या वतीने 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' या ग्लोबल समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्लोबल समिटला आजपासून सुरुवात झाली आहे. या ग्लोबल समिटमध्ये देशासह विदेशातील अनेक नामवंत व्यक्ती सहभागी होणार असून, ते विविध महत्त्वांच्या विषयांवर चर्चा करणार आहेत.

TV9 Global Summit 2022 Live: देशाला युनिफॉर्म सिव्हिल कोड ची गरज नाही : ओवेसी

भारताचे नंबर वन टीव्ही नेटवर्क टीव्ही 9 च्या वतीने ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या ग्लोबल समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्लोबल समिटला आजपासून सुरुवात झाली आहे. या ग्लोबल समिटमध्ये देशासह विदेशातील अनेक नामवंत व्यक्ती सहभागी होणार असून, ते विविध महत्त्वांच्या विषयांवर चर्चा करणार आहेत. या दोन दिवशीय ग्लोबल समिटमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, यांच्यासह विविध केंद्रीय मंत्री आणि राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी होणार आहेत. या समिटमध्ये राजकारण, प्रशासन, अर्थशास्त्र, आरोग्य, सांस्कृतिक व क्रीडा अशा प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Jun 2022 06:32 PM (IST)

    राष्ट्रवादीच्याच प्रवक्त्यानी केली सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना हटवण्याची मागणी

    – भ्रष्ट्राचाराला खतपाणी घालणारा आणि सहकाराला बदनाम करणारा सहकार मंत्री नको,

    – राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांची पक्षाकडे मागणी,

    – यासंदर्भात लवांडे यांनी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली सहकारमंत्र्यांना हटवण्याची मागणी,

    – सहकारमंत्र्यांच्या कामामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा विकास लवांडे यांचा आरोप

  • 17 Jun 2022 06:15 PM (IST)

    देशाला युनिफॉर्म सिव्हिल कोड ची गरज नाही : ओवेसी

    या देशातील गावातच असा कायदा आहे की जिथे हिंदु दाम्पंत्याला मुलगा झाला नाही तर दुसरा विवाह करण्याची परवानगी आहे. देशाची विविधताच या देशाची सुंदरता आहे. या देशाला युनिफॉर्म सिव्हिल कोड ची गरज नाही.

  • 17 Jun 2022 05:46 PM (IST)

    29 तारखेला तक्रार दाखल केली होती काय झालं त्याच : ओवेसी

    भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्म्द यांच्यावर वादग्रस्त विधान केले. ते 27 तारखेला त्यांनी केले. त्यानंतर त्याविरोधात 29 तारखेला तक्रार दाखल केली. मात्र त्यावर त्यांच्यावर कारवाई कधी होते? तर अरब राष्ट्रे आपला विरोध दाखवल्यानंतर.

  • 17 Jun 2022 05:38 PM (IST)

    …आणि भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी वेळ लागणार नाही : नितीन गडकरी

    आपण असेच चालत राहिलो तर आपण नक्की जिंकू आणि भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी वेळ लागणार नाही : नितीन गडकरी

  • 17 Jun 2022 05:31 PM (IST)

    देशाला युनिफॉर्म सिव्हिल कोड ची गरज नाही : ओवेसी

    या देशातील गावातच असा कायदा आहे की जिथे हिंदु दाम्पंत्याला मुलगा झाला नाही तर दुसरा विवाह करण्याची परवानगी आहे. देशाची विविधताच या देशाची सुंदरता आहे. या देशाला युनिफॉर्म सिव्हिल कोड ची गरज नाही.

  • 17 Jun 2022 05:25 PM (IST)

    असदुद्दीन ओवेसी मुसलमानांचा ना लिडर आहे आणि ना कधी असेल

    या कार्यक्रमात असदुद्दीन ओवेसी यांना आपण मुसलमानांचे लिडर आहात का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, असदुद्दीन ओवेसी मुसलमानांचे ना लिडर आहेत आणि ना कधी असतील. मला हैदराबादच्या जनतेने निवडणून दिले आहे. मी सदा गरिब आणि शोषित जनतेची सेवा करणार. आज ही आपण मुसलमानांच्या देशभक्तीवर संशय करताय. मी देशभक्तीवर अल्लाहची शपथ घेतली आहे.

  • 17 Jun 2022 04:59 PM (IST)

    कोळशाच्या टंचाईमुळे वीजपुरवठा खंडित होणार नाही : प्रल्हाद जोशी

    कोळशाच्या पुरवठ्यावरून देशाची स्थिती काय आहे? यावर बोलताना प्रल्हाद जोशी म्हणाले की, आता आमच्याकडे साडेबारा दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. आमच्याकडे 50-55 दशलक्ष टन कोळसा साईडिंगमध्ये पडून आहे. तर गेल्या वेळेच्या तुलनेत कोळसा उत्पादन वाढले आहे. मी दाव्याने सांगतो की, कोळशाच्या कमतरतेमुळे देशात वीजपुरवठा खंडित होणार नाही.

  • 17 Jun 2022 04:47 PM (IST)

    गांधी कुटुंबाला वाटतं की ते देशाच्या कायद्यापेक्षा मोठे आहेत : प्रल्हाद जोशी

    पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या ईडीच्या चौकशीच्या मुद्द्यावर प्रसाद जोशी यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, जर त्यांनी काही चुकीचे केले नसेल तर ते का घाबरतं आहेत. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असताना त्यांचीही चौकशी केली गेली होती. तर आजचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही खोटा एफआयआर दाखल करण्यात आला. त्यांनी गांधी घराण्याला नकली गांधी असे संबोधले. ते म्हणाले की, त्यांना असे वाटते की, ते देशाच्या कायद्यापेक्षा मोठे आहेत. पण हे सत्य नाही.

  • 17 Jun 2022 04:29 PM (IST)

    4 वर्षे सैन्यात सेवा दिल्यानंतर आयुष्यात येईल शिस्त : शेखावत

    अग्निपथ योजनेचा संदर्भ देत शेखावत म्हणाले की, जगातील अनेक देश या पद्धतीने काम करत आहेत. काही लोक विरोध करण्यासाठी विरोध करत आहेत. मात्र मला खात्री आहे की, तरुण हे समजून घेतील आणि याचा स्विकार करतील. 4 वर्षे सैन्यात सेवा दिल्यानंतर तरुणांच्या जीवनात शिस्त येईल. लष्कराचे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात निवृत्त झाल्यानंतरही देशाप्रती जिद्द कमी होत नाही. आणि त्यांच्या आयुष्यात शिस्त कायम राहते.

  • 17 Jun 2022 04:25 PM (IST)

    प्रत्येक घरात पोहचायला हवे शुद्ध पाणी : गजेंद्र सिंह शेखावत

    पीएम मोदींचा संकल्प – प्रत्येक घरात पोहचायला हवे शुद्ध पाणी : गजेंद्र सिंह शेखावत

  • 17 Jun 2022 04:15 PM (IST)

    माझ्या गुरूंनी माझ्या पक्षाची विचारधारा सांगितली : गजेंद्र सिंह शेखावत

    राजस्थानमध्ये पुढील मुख्यमंत्रिपदाच्या दाव्याच्या प्रश्नावर गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, मी 22 वर्षे सीमाभागात काम केले आहे, सीमेवर राहणाऱ्या लोकांच्या समस्या समजून घेतल्या आहेत. कारण माझ्या गुरूंनी माझ्या पक्षाची विचारधारा सांगितली. 2014 मध्ये त्यांनी ठरवलं की मी राजकीय क्षेत्रात काम करायचं. 2024 मध्ये त्यांनी मला वनवासी विकास प्राधिकरणात काम करण्यास सांगितले तर मी ते ही काम करेन.

  • 17 Jun 2022 03:53 PM (IST)

    आमच्या सरकारने देशाला पहिले उत्पादन धोरण दिले : आनंद शर्मा

    रोजगाराच्या प्रश्नावर आनंद शर्मा म्हणाले- ‘आमच्या सरकारने देशाला पहिले उत्पादन धोरण दिले. यामुळे मॅन्युफॅक्चरिंग कॉरिडॉरचा विकास झाला.

  • 17 Jun 2022 03:46 PM (IST)

    मुस्लिमांचे मतदान कमी होते… पण : आनंद शर्मा

    आम्हाला देशातील मुस्लिमांचे मतं कमी मिळतात. हे सत्य आहे. आम्ही जनधन योजनाची सुरूवात केली. मात्र त्यातून आम्ही मुस्लिमांना वगळल नाही. आम्ही गाव गाव विज दिली. पण मुस्लिमांना सोडलो नाही. असं झालं नाही. त्यामुळं आपल्याला कामातून पाहिलं पाहिलं. आम्हाला याचं फार वाईट की सरदार पटेल यांचे निधन 1950 मात्र त्यांना भारत रत्न हे 1991 मध्ये देण्यात आलं. तर मौलाना आझाद यांच्या बाबतीत ही हेच झालं. त्यांना ही 1991 मध्येच भारत रत्न देण्यात आला.

  • 17 Jun 2022 03:28 PM (IST)

    ब्रेकनंतर पुन्हा सुरू झाला देशातील सर्वात मोठा ग्लोबल समिट

    जेवनाच्या ब्रेकनंतर टिव्ही9 चा ग्लोबल समिटला पुन्हा सुरूवात. आता या सेसनमध्ये ‘इंडिया फर्स्ट’विषयावर देशातील मोठ्या दोन राजकीय पक्षांचे नेते मांडणार आपले विचार, त्यानंतर आत्मनिर्भर भारतवर चर्चा होईल

  • 17 Jun 2022 03:21 PM (IST)

    शिक्षणाशिवाय सुधारणा शक्य नाही- अरिफ मोहम्मद खान

    शिक्षणाशिवाय सुधारणा शक्य नाही. कुरआनच्या एका श्लोकात असे लिहिले आहे की लोकांना ज्ञान दिले पाहिजे- अरिफ मोहम्मद खान

  • 17 Jun 2022 02:37 PM (IST)

    भारत डिजिटायझेशनमध्ये जगात आघाडीवर अमेरिकेलाही टाकले मागे – रॉबिन रैना

    ग्लोबल समिटमध्ये बोलताना रॉबिन रैना यांनी म्हटले आहे की, डिजिटायझेशन क्षेत्रात भारताने मोठी क्रांती केली आहे. आज देशात प्रत्येक गोष्ट ही डिजिटल होत आहे. डिजिटायझेशनमुळे ऑनलाईन पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण वाढली. यामुळे करचोरीला मोठा आळा बसला आहे. भारताने डिजिटल पेमेंटमध्ये अमेरिकेसारख्या देशाला देखील मागे टाकले आहे.

  • 17 Jun 2022 02:27 PM (IST)

    कायदा लागू झाल्यानंतर तीन तलाक प्रकरणात 91 टक्के घट – आरिफ मोहम्मद खान

    यावेळी बोलताना आरिफ मोहम्मद खान यांनी तीन तलाक कायद्याचे कौतुक केले आहे. कायदा लागू झाल्यापासून तीन तलाकची प्रकरणे 91 टक्के कमी झाल्याचे खान यांनी म्हटले आहे. या कायद्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कायम स्मरणात ठेवले जाईल असे देखील आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटले आहे.

  • 17 Jun 2022 01:56 PM (IST)

    ओवेसी व आरिफ मोहम्मद मुस्लिमबहुल भागातून लढले तर कोण जिंकणार?

    ओवेसी आणि आरिफ मोहम्मद हे दोघेही एकोंमेकांविरोधात मुस्लिमबहुल भागातून लढले तर कोण विजयी होणार? असा प्रश्न यावेळी आरिफ मोहम्मद यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना आरिफ मोहम्मद यांनी म्हटले आहे की, मला माहित नाही कोण विजयी होईल. मात्र मी आतापर्यंत जेवढ्या निवडणुका लढल्या त्या मुस्लिमबहुल भागातूनच लढल्या आणि विजयी देखील झालो.

  • 17 Jun 2022 01:38 PM (IST)

    भारतीय संस्कृती ज्ञानाच्या प्रसारासाठी ओळखली जाते – अरिफ मोहम्मद खान

    केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान हे देखील टीव्ही 9 च्या ग्लोबल समिटमध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, अनेक इतिहासकारांनी जगात पाच प्रमुख संस्कृती असल्याचे सांगितले आहे. ज्यामध्ये भारत ही एकमेव अशी संस्कृती आहे, जी ज्ञानाचा प्रसार करते. हदीसमध्ये असे लिहिले आहे की जो कोणी भारतात येतो तो या संस्कृतीचा अनुभव घेतो.

  • 17 Jun 2022 01:21 PM (IST)

    कर्नाटक निवडणुकीच्या तयारीला सुरुवात – बसवराज बोम्मई

    कर्नाटकमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. भाजपा पक्षश्रेष्ठींकडून आगामी कर्नाटक विधानसभा निवडणूक ही बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्त्वाखालीच लढवली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याबाबत बोलताना बोम्मई यांनी म्हटले आहे की, आपचे लक्ष्य ठरले आहे. आम्ही दीडशे जागा जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहोत. त्यासाठी आमची तयारी देखील सुरू झाली आहे. राज्य सरकारने जनतेला जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्यावर आमचा भर आहे.

  • 17 Jun 2022 01:13 PM (IST)

    ‘सेमीकंडक्टर बनवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणारे कर्नाटक पहिले राज्य’

    सध्या देशात सेमीकंडक्टरचा तुटवडा आहे. सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे वाहन उद्योग अडचणीत आहेत. वाहनाचा तुटवडा असल्याने किमतीमध्ये देखील वाढ झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये सेमीकंडक्टर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणारे कर्नाटक हे पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या करानुसार आता राज्यात सेमीकंडक्टरचे उत्पादन होणार आहे.

  • 17 Jun 2022 12:56 PM (IST)

    कर्नाटकात सर्वाधिक संशोधन केंद्रे – बसवराज बोम्मई

    टीव्ही 9 नेटवर्कने आयोजित केलेल्या या ग्लोबल समिटमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे की, कर्नाटक भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. आमच्याकडे सर्वाधिक संशोधन केंद्रे आहेत. अनेक बड्या कंपन्या कर्नाटकात आपला विस्तार करू पाहात आहेत. 500 फॉर्च्युन कंपन्यांपैकी 400 एकट्या कर्नाटकमध्ये आहेत. कर्नाटकाला सर्वच पातळीवर अधिक समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

  • 17 Jun 2022 12:49 PM (IST)

    राष्ट्रीय हरित भारत अभियानाला सुरुवात – भूपेंद्र यादव

    प्रदुषण कमी कसे करता येईल यासाठी सध्या विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. वन मंत्रालय आणि जलसंपदा मंत्रायलाकडून या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राष्ट्रीय हरित भारत अभियानाला सुरुवात झाल्याचे भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे.

  • 17 Jun 2022 12:30 PM (IST)

    प्रत्येकाला रोजगाराची हमी – भुपेंद्र यादव

    यावेळी बोलताना भुपेंद्र यादव यांनी म्हटले आहे की, रोजगारासंदर्भात देशासमोर अनेक आवाहने आहेत. मात्र आम्ही त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढील दीड वर्षामध्ये दहा लाख नवे रोजगार निर्माण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. पीएफच्या आकडेवारीवर नजर टाकाली तर आपल्याला देशात रोजगार वाढत असल्याचे दिसून येते .

  • 17 Jun 2022 12:25 PM (IST)

    अग्निपथ योजनेचा विरोध चुकीचा – भूपेंद्र यादव

    या ग्लोबल समिटमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी अग्रिपथ योजनेला होत असलेल्या विरोधावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोतलताना त्यांनी म्हटले आहे की, अग्निपथ योजनेला विरोध करणे चुकीचे आहे. केंद्र सरकारने खूप विचारपूर्वक ही योजना तयार केली आहे. या योजनेमुळे तरुणांचा फायदाच होणार असून, सैन्यदल अधिक मजबूत बनण्यास मदत होईल. या योजनेंतर्गत काही तरुणांना पुढे देखील काम करण्याची संदी मिळणार आहे.

  • 17 Jun 2022 12:13 PM (IST)

    2025 पर्यंत ऑटोमोबाईल उद्योगाला 15 लाख कोटींच्या घरात पोहोचवण्याचा प्रयत्न – गडकरी

    या ग्लोबल समिटमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या ऑटोमोबाईल उद्योग हा साडेसहा लाख कोटी रुपयांचा आहे. येत्या 2025 पर्यंत ऑटोमोबाईल क्षेत्राला चालना देऊन तो 15 लाख कोटींच्या घरात पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

  • Published On - Jun 17,2022 12:08 PM

    Follow us
    कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
    कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
    सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
    सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
    सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
    सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
    सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
    सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
    सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
    सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
    लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
    लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
    'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
    'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
    ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
    ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
    ...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
    ...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
    सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
    सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.