Twin Tower चा मालकाने दु:ख सांगावं तरी कुणाला, टॉवर पाडण्याच्या आदल्या रात्री तो रात्रभर…फक्त…
नऊ सेंकदात इमारत पत्त्या सारखी पाडण्यात आली, कारण तिथं चुकीच्या पद्धतीने बांधल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच हे प्रकरण खुप दिवसांपासून न्यायालयात होतं.
मुंबई : ट्विनचा टॉवर (Twins Tower) पाडल्यानंतर देशात अनेक चर्चा झाल्या. त्यापैकी पाडला तो चांगला झाला असं काही लोकांचं सोशल मीडियावर (Social Media) मत होतं. तर काही लोकांनी तो पाडायला नको होता असं मतं नोंदवलं. 2009 मध्ये हा प्रकल्प तयार करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांनी हा प्रकल्प चांगला असून त्याची अधिक जाहिरात केली होती. परंतु ज्यावेळी हा प्रकल्प पाडण्यात आला त्यावेळी मी रात्रभर झोपू शकलो नाही अशी प्रतिक्रिया मालक आर के अरोरा (R k Arora) यांनी दिली आहे. काल हा प्रकल्प पाडण्यासाठी व्यवसायिकांचा पैसा लागला होता. त्यामुळे प्रकल्प पाडण्याच्या आगोदर आदल्या रात्री झोप आली नाही अशी प्रतिक्रिया मालकांनी दिली आहे.
ज्यावेळी 2009 मध्ये हा प्रकल्प बांधण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी तिथं अधिक जाहीरात करण्यात आली होती. तसेच हा प्रकल्प मोठा असून तिथं अनेक मोठ्या उद्योजकांनी घर खरेदी केली होती. तसेच तिथं दोन, तीन, चार आणि पाच बीएचके अशी घरं तयार करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार साधारण 711 लोकांनी तिथं घरं बुक केली होती. त्यामुळे तिथं मोठी लोकं राहायला येणार अशी चर्चा देखील होती.
नऊ सेंकदात इमारत पत्त्या सारखी पाडण्यात आली, कारण तिथं चुकीच्या पद्धतीने बांधल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच हे प्रकरण खुप दिवसांपासून न्यायालयात होतं. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने बांधकाम व्यवसायिकाच्या पैशाने ही इमारत पाडली. ही इमारत स्वत:च्या पैशाने पाडणार असल्याने मालक रात्रभर झोपले नाहीत.