उपराष्ट्रपती नायडूंच्या ‘ब्लू’ टिकवर ट्विटरचा सावळा गोंधळ, धक्का देण्याचा प्रयत्न?
पराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडूंच्या ट्विटर हँडलवर ट्विटरचा सावळा गोंधळ उघड झाला. नायडूंचं जे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट आहे. (Twitter Briefly Drops Blue Tick From M Venkaiah Naidu's Personal Handle)
नवी दिल्ली: उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडूंच्या ट्विटर हँडलवर ट्विटरचा सावळा गोंधळ उघड झाला. नायडूंचं जे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट आहे, त्याची ब्लू टिक हटवत आधी अनव्हेरिफाईड केलं गेलं आणि नंतर काही तासात ते पुन्हा व्हेरिफाईड केलं गेलं. पण उपराष्ट्रपतीपदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीबद्दल ट्विटरची ही कारवाई अनेक चर्चांना उधान आणणारी आहे. (Twitter Briefly Drops Blue Tick From M Venkaiah Naidu’s Personal Handle)
नायडूंची ब्लू टिक का हटवली?
ज्यांचं ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड केलेलं असतं, त्यांना ब्लू टिक दिलेली असते. बहुतांश नेत्या, अभिनेत्यांचे ट्विटर हँडल हे व्हेरिफाईड आहेत आणि त्यानंतरच त्यांना ट्विटरनं ब्लू टिक दिलेली असते. नायडूंना दिलेली तिच ब्लू टिक हटवल्यामुळे आता त्यांचं ट्विटर हँडल एका सामान्य व्यक्तीनं वापरावं तसं आहे. म्हणजेच नायडूंच्या ट्विटर हँडलची सत्यता काढून घेण्यात आली आहे. ट्विटरनं असं का केलं असावं? याबाबत अजून तरी ट्विटरकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. पण गेल्या जानेवारी महिन्यापासून नायडूंनी एकही ट्विट त्यांच्या वैयक्तिक हँडलवरुन केलेलं नाही. त्यामुळेच ट्विटरनं त्याची सत्यता काढून घेतली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. पण जाणकारांच्या माहितीनुसार असे अनेक नेते, अभिनेते आहेत, ज्यांनी अनेक महिन्यांमध्ये एकही ट्विट केलेलं नाही पण त्यांची सत्यता काढून घेण्यात आलेली नाही. गेल्या काही काळापासून ट्विटर आणि मोदी सरकारचा वाद कोर्टात सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवरच ट्विटरनं असा काही निर्णय घेतला असावा का, याचीही चर्चा सुरु झालीय. काहीही असो पण एक गोष्ट निश्चित, ट्विटरचा हा निर्णय नायडूंसाठी धक्कादायक आहे.
जेव्हा अमित शाहांचा फोटो ट्विटरने हटवला
भाजप नेत्यांना ट्विटरनं पहिल्यांदाच असा धक्का दिला आहे असं नाही तर यापूर्वीही असे काही निर्णय घेतलेले आहेत. अमित शाह यांचा प्रोफाईल फोटोच काही दिवसांपुर्वी ट्विटरने हटवला होता. शाह जो फोटो ट्विटर प्रोफाईलला वापरायचे, त्याचे कॉपीराईटस त्यांच्याकडे नव्हते असा दावा केला गेला. त्याविरोधात ज्यानं फोटो काढला त्यानं क्लेम केल्यानंतर ट्विटरनं त्यांचा प्रोफाईल फोटो हटवला होता. नंतर मात्र शाहांचा फोटो पुन्हा ट्विटरनं प्रस्थापित केला.
जम्मू आणि काश्मीरच्या प्रशासकांनाही झटका
जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांचं तर ऑफिशियल ट्विटर अकाऊंट ट्विटरने सस्पेंड केले होते. सिन्हा यांचे ट्विट हे ट्विटरच्या नियमांचा भंग करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. सिन्हा हे जरी उपराज्यपाल असले तरीसुद्धा ते भाजपाचे नेते आहेत हे महत्वाचं. केंद्रात ते मंत्रीपदावरही राहीले होते. जम्मू काश्मीरसारख्या राज्याच्या मुख्य प्रशासकालाच ट्विटरनं झटका दिल्यामुळे उलटसुलट चर्चाही रंगली होती. (Twitter Briefly Drops Blue Tick From M Venkaiah Naidu’s Personal Handle)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 5 June 2021 https://t.co/KMFf4j8nrh #News #Bulletin #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 5, 2021
संबंधित बातम्या:
संरक्षण मंत्रालयाची नौदलाला 6 सबमरीनसाठी मंजूरी, 43,000 कोटी रुपये खर्च
अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू, पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान, नेमका वाद काय?
(Twitter Briefly Drops Blue Tick From M Venkaiah Naidu’s Personal Handle)