नायडूच नाही तर आरएसएसच्या नेत्यांनाही ट्विटरचा दे धक्का, ब्लू टिक हटवली!

उपराष्ट्रपती नायडुच नाही तर संघाच्याही काही पदाधिकाऱ्यांची ट्विटरनं ब्लू टिक हटवली. | M Venkaiah Naidu Twitter handle

नायडूच नाही तर आरएसएसच्या नेत्यांनाही ट्विटरचा दे धक्का, ब्लू टिक हटवली!
Facebook Twitter
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 11:58 AM

नवी दिल्ली: ट्विटरनं उपराष्ट्रपती नायडुंचं वैयक्तिक ट्विटर हँडल आधी अनव्हेरिफाईड केलं आणि नंतर पुन्हा व्हेरिफाईड केलं. ट्विटरनं असं का केलं ते आधी नाही सांगितलं. पण पुन्हा ब्लू टिक प्रस्थापित केल्यानंतर का हटवली ते सांगितलं. पण नायडुंना (M Venkaiah Naidu आधी जो धक्का दिला तो फक्त त्यांनाच दिला असं नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही (RSS) काही नेत्यांना ट्विटरनं अनव्हेरिफाईड केलं. त्यामुळे मोदी सरकार आणि ट्विटर यांच्यातला संघर्ष आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. (Twitter spox on blue tick removal from Vice President of India M Venkaiah Naidu’s personal Twitter handle)

नेमकी कुणाची ब्लू टिक काढली?

फक्त उपराष्ट्रपती नायडुच नाही तर संघाच्याही काही पदाधिकाऱ्यांची ट्विटरनं ब्लू टिक हटवली. म्हणजे अकाऊंटची सत्यता काढून टाकली आहे. यात संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख अरूण कुमार आणि सह सरकार्यवाह सुरेश सोनी यांच्या ट्विटर हँडलचा समावेश आहे. नायडुंची ब्लू टिक का हटवली ते ट्विटरनं स्पष्टपणे सांगितलं पण संघाच्या नेत्यांची का हटवली ते मात्र सांगितलेलं नाही.

ट्विटर आणि मोदी सरकारचा वाद काय?

मोदी सरकारनं सोशल मीडियासाठी काही नवे नियम तयार केले आहेत. हे नियम पाळायला ट्विटरनं विरोध दर्शवला आहे. त्याच्याविरोधात ट्विटर थेट कोर्टातही गेलं आहे. काही दिवसांपुर्वी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस टुलकिट म्हणून काही ट्विट केले. ट्विटरनं पात्रांच्या ट्विटला खोटारडं ठरवतं मॅन्युपिलेटेडचा टॅग दिला. त्यावरुन भाजपचे नेते लाले लाल झाले. ट्विटरनं भारतीय कायद्यांचा मान ठेवत त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी असा दम केंद्र सरकारनं भरला. ट्विटरनं मात्र आम्ही नियमांचं पालन करु पण पारदर्शकताही ठेऊ असं म्हणालं. केंद्रानं जे नवे सोशल मीडियासाठी नियम बनवलेले आहेत ते व्यक्तीस्वातंत्र्यविरोधी आहेत असा दावा ट्विटरचा आहे. तसच त्या नियमांच्या आधारावर ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना पोलीसी त्रास दिला. जाईल अशी भीतीही ट्विटरनं व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या:

उपराष्ट्रपती नायडूंच्या ‘ब्लू’ टिकवर ट्विटरचा सावळा गोंधळ, धक्का देण्याचा प्रयत्न?

(Twitter spox on blue tick removal from Vice President of India M Venkaiah Naidu’s personal Twitter handle)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.