नोकरी सोडली, घरच्या छतावर केसरची शेती, लाखो कमवले, शेतकऱ्याची पोरं लय भारी

शेतकरी बंधुंनी स्वत:च्या घराच्या छतावर अवघ्या 15 फुटाच्या जागेत केसरची यशस्वी शेती करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे (two farmer brother saffron farming on terrace and earn money in lacs on Haryana).

नोकरी सोडली, घरच्या छतावर केसरची शेती, लाखो कमवले, शेतकऱ्याची पोरं लय भारी
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 7:44 PM

चंदिगड : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे हरियाणातील दोन शेतकरी बांधवांच्या यशाची कहाणी समोर आली आहे. या शेतकरी बंधुंनी स्वत:च्या घराच्या छतावर अवघ्या 15 फुटाच्या जागेत केसरची यशस्वी शेती करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांनी या प्रयोगात लाखो रुपये कमवल्याची माहिती समोर आली आहे (two farmer brother saffron farming on terrace and earn money in lacs on Haryana).

लॉकडाऊन काळात हिसार जिल्ह्याच्या कोथकला गावात राहणाऱ्या नवीन आणि प्रवीण या दोघी भावांनी आपल्या घराच्या छतावर केसरची शेती सुरु केली. त्यांनी एक प्रयोग म्हणून ही शेती केली. त्यांनी ऐयरोफोनिक पद्धतीने ही शेती केली. या शेती पद्धतीने त्यांनी 6 ते 9 लाखांचं उत्पन्न काढलं आहे.

केसरची शेती शक्यतो जम्मू-काश्मीरमध्येच मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, हरियाणाच्या या तरुणांनी ऐयरोफोनिक पद्धतीने ही शेती आपल्या घराच्या छतावर केली. ऐयरोफोनिक पद्धतीने आतापर्यंत इराण, स्पेन, चीन या देशांमध्ये केसरची शेती करण्यात आली आहे. मात्र, भारतात जम्मू-काश्मीरमध्येच केसरची शेती केली जाते. तिथूनच संपूर्ण देश आणि विदेशात केसरचा पुरवठा केला जातो.

नवीन आणि प्रवीण यांनी शेती कशी केली?

नवीन आणि प्रवीण यांनी सर्वात आधी यूट्यूबवर केसरची शेतीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी जम्मूतून केसरचे 250 रुपये प्रतिकिलो हिशोबाने बियाणे खरेदी केले. त्यांनी 100 किलो पेक्षा जास्त बियाणे खरेदी केले. त्यानंतर त्यांनी आपल्या घराच्या छतावर 15×15 च्या जागेवर प्रायोगिक तत्वावर शेती करण्यास सुरुवात केली. त्यांचा हा प्रोजेक्य ऑगस्ट-नोव्हेंबर 2020 पर्यंत पूर्ण झाला.

त्यांनी केलेल्या प्रयोगात एक ते दीड किलो केसरचं उत्पादन झालं. सुरुवातीला त्यांना 6 ते 9 लाखांचं उत्पन्न मिळालं. बाजारात सध्या केसर अडीच ते तीन लाख रुपये प्रतीकिलोच्या भावात मिळतं.

दरम्यान, या शेतीबाबत प्रवीण आणि नवीन यांनी प्रतिक्रिया दिली. “हा प्रोजेक्ट 7 ते 10 लाख रुपयात सुरु करता येऊ शकतो. एवढ्या खर्चात वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनही लावता येऊ शकतात. विशेष म्हणजे शेतकरी घरच्याघरी ही शेती करु शकतात. शेतकरी अशा प्रकारच्या शेतीतून 10 ते 20 लाखांचं उत्पन्न काढू शकतात”, अशी माहिती त्यांनी दिली.

केसरच्या शेतीसाठी दिवसा तापमान हे 20 अंश सेल्सिअस हवं. तर रात्री 10 अंश सेल्सिअस हवं. 90 टक्के ह्यूमस असली पाहिजे. सूर्यप्रकाशही मिळायला हवा. याशिवाय सूर्यप्रकाश नाही राहिला तर लाईटचा वापर करुन प्रकाश देता येऊ शकतो. मात्र, लॅम्प हा बॅक्टेरिया फ्री असावा. त्याचबरोबर थर्मोकॉलचाही वापर करावा.

केसरपासून साबण, तेल, फेस मास्कसह अनेक गोष्टी बनविल्या जातात. केसरला मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे. गर्भवती महिला, वृद्ध यांच्यासाठी केसर जास्त लाभदायक आहे. त्याचबरोबर कर्करोग, हृदय रोग, खोकला इत्यादी आजारांसाठी देखील केसर गुणकारी आहे (two farmer brother saffron farming on terrace and earn money in lacs on Haryana).

हेही वाचा : पूजाच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांना धक्का, वडील म्हणाले… 

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.