एका लग्नाची भलतीच गोष्ट! नवरीच्या दारी आल्या दोन वराती; एकाच्या गळ्यात वरमाला, दुसऱ्यासोबत नांदायला!
लग्नाचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. गंमतीजंमतीही आपण अनुभवल्या आहेत. पण उत्तर प्रदेशातील एटामध्ये मात्र एका लग्नाची भलतीच गोष्ट वऱ्हाडी मंडळींना पाह्यला मिळाली. (Two Grooms With 'Baraat' Reach Bride's House; Know What Happens)
एटा: लग्नाचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. गंमतीजंमतीही आपण अनुभवल्या आहेत. पण उत्तर प्रदेशातील एटामध्ये मात्र एका लग्नाची भलतीच गोष्ट वऱ्हाडी मंडळींना पाह्यला मिळाली. लग्न घटीकेला काही वेळ बाकी असतानाच नवरीच्या दारी दोन वराती आल्या. यावेळी नवरीने आधी आलेल्या नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकली. नंतर आलेल्या नवरदेवासोबत सात फेरे घेऊन नांदायला गेली. या प्रकाराने वऱ्हाडी मात्र चांगलेच चक्रावून गेले असून संपूर्ण उत्तर प्रदेशात या लग्नाची खमंग चर्चा सुरू आहे. (Two Grooms With ‘Baraat’ Reach Bride’s House; Know What Happens)
उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील सिरांव या गावात ही अजब घटना घडली. सिरांवमध्ये एक नवरदेव वरात घेऊन नवरीच्या घरी आला. त्यामुळे नवरीने नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकली. त्यानंतर काही वेळाने तिच्या घरी दुसरी वरात आली. तेव्हा नवरीने ज्याच्या गळ्यात वरमाला घातली तो नवरदेव वयाने मोठा असल्याचं सांगून त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या नवरदेवाबरोबर सात फेरे घेतले आणि त्याच्याबरोबर नांदायला गेली.
दोन्ही नवरदेव एकाच जिल्ह्यातील
विशेष म्हणजे वरात घेऊन आलेले दोन्ही नवरदेव एटा जिल्ह्यातील आहेत. एक वरात मिरहची पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जिन्हेंरा गावातून आली होती. तर दुसरी वरात अवागढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरौरा गावातून आली होती. ज्याच्या गळ्यात सर्वात आधी वरमाळा घालण्यात आली होती, तो नवरदेव अवागढचा रहिवासी आहे.
नवरीच्या वडिलांना अटक
नवरीच्या या निर्णयामुळे सर्वच जण चक्रावून गेले. त्यामुळे सर्वात आधी वरात घेऊन आलेल्या नवरदेवाच्या कुटुंबीयांनी एकच गोंधळ घातला. त्यानंतर हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत गेलं. पोलिसांनी लग्नात येऊन नवरीच्या वडिलांना अटक केली आहे. लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप नवरदेवाच्या कुटुंबीयांनी केला आहे. (Two Grooms With ‘Baraat’ Reach Bride’s House; Know What Happens)
50 Super Fast News | राज्यातील 10 जिल्ह्यांमधील निर्बंध हटवण्याचा निर्णयhttps://t.co/QsB6efzeTk#bulletin |#news
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 5, 2021
संबंधित बातम्या:
लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरकडून बलात्कार, नर्सचा आरोप, मुंबईत गुन्हा
वाढदिवसाच्या दिवशी विश्वासघात ! जंगलात नेऊन बलात्कार, प्रियकराने असं का केलं? तरुणीला हुंदका
(Two Grooms With ‘Baraat’ Reach Bride’s House; Know What Happens)