Amarnath Cloudburst : अमरनाथ यात्रेत पुण्यातील दोघांचा मृत्यू, तीन जिल्ह्यातील 111 भाविक सुरक्षित

पुण्याच्या आळंदीतून अमरनाथ यात्रेला गेलेले 14 भाविक संपर्काबाहेर आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. यावर्षी एकून 50 भाविक यात्रेसाठी गेले होते. 14 नागरिकांशी अजूनही काहीच संपर्क होऊ शकला नसल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.

Amarnath Cloudburst : अमरनाथ यात्रेत पुण्यातील दोघांचा मृत्यू, तीन जिल्ह्यातील 111 भाविक सुरक्षित
अमरनाथ यात्रेत पुण्यातील दोघांचा मृत्यूImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 9:26 AM

Cloudbursts in Amarnath:  जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ (Amarnath Cloudburst) गुहेजवळ शुक्रवारी ढगफुटी सदृश पाऊस होऊन झालेल्या दुर्घटनेत 16 हून अधिक जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर 50 हून अधिक जण जखमी ( Injured) झाले आहेत. तसेच काही भाविक अद्यापही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेनंतर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली. दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील दोन जणांचाही येथे मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्रामधून अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी शेकडो भाविक जात असतात. या दुर्घटनेवेळी तेथे महाराष्ट्रातील अनेक भाविक उपस्थित होते. काही भाविकांचा संपर्क झालाय तर अनेकजण बेपत्ता असल्याचं माहिती आहे. आतापर्यंत यात्रेमधील पुणे, अकोला, बीड जिल्ह्यातील भाविकांची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे चिंतेचं वातावरण असून अजून किती भाविक यामध्ये अडकले याची ठोस माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

पुण्यातील 14 भाविक संपर्काबाहेर

पुण्याच्या आळंदीतून अमरनाथ यात्रेला गेलेले 14 भाविक संपर्काबाहेर आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. यावर्षी एकून 50 भाविक यात्रेसाठी गेले होते. अपघातानंतर पुण्यातील भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता 50 पैकी 36 भाविकांशीच संपर्क होऊ शकला आहे. 14 नागरिकांशी अजूनही काहीच संपर्क होऊ शकला नसल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.

पुण्यातील धायरी येथे असणाऱ्या भोसले कुटुंबाचे तीन सदस्य हे या यात्रेसाठी गेले होते. यामध्ये सुनीता भोसले यांचं दुःखद निधन झालं. धायरीमध्ये राहणारे महेश राजाराम भोसले, सुनिता महेश भोसले, प्रमिला प्रकाश शिंदे हे तिघे बेपत्ता असल्याची माहिती आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी धायरी येथे भोसले कुटुंबाची भेट घेत त्यांच सांत्वन करत जिल्हा प्रशासनाशी भोसले कुटुंबाचा संपर्क देखील करून दिला आहे. अमरनाथ यात्रेसाठी यावर्षी पुण्यातून एकून 50 भाविक गेले होते. त्यातल्या अनेक नागरिकांशी सकाळपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु होता.

बीडमधीलमधील 11 भाविक अडकले

आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून 39 भाविक भक्त गेले होते. त्यातील 28 भविक भक्त बालटल येथे सुखरूप खाली आले आहेत. तर 11 जन वरतीच अडकले आहेत. तरी त्यांना एनडीआरएफ जवान आणि भारतीय लष्कराच्या मदतीनं सुरक्षित स्थळी आणण्याचं काम सुरू आहे.

अकोल्यातील 47 यात्रेकरुंशी संपर्क-

अकोल्यातून अमरनाथ यात्रेकरिता गेलेल्या 18 यात्रेकरूंचा गट सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. अकोला जिल्हा प्रशासनाशी आतापर्यंत 47 यात्रेकरूनी संपर्क केला आहे. यातील 29 यात्रेकरू अकोटचे आणि अकोल्यातील 18 यात्रेकरूंचा गट अमरनाथ यात्रा न करताच पहलगामवरून वैष्णोदेवीकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.