दोन हजार रुपयांची नोट परत घेणार! कशी आली होती चलनात? तेव्हा नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या

भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना तात्काळ प्रभावाने दोन रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवण्याचा सल्ला दिला आहे.

दोन हजार रुपयांची नोट परत घेणार! कशी आली होती चलनात? तेव्हा नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 7:40 PM

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवण्यास सांगितलं आहे. असं असलं तरी दोन हजार रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदा म्हणून सुरू राहतील. मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयने क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे.

दोन हजार रुपयांची नोट कधी आली चलनात?

भारत सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांची नोट बंद करण्याच निर्णय घेतला होता. त्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला रात्री 8 वाजता संबोधित करताना हा निर्णय जाहीर केला होता. रात्री 12 नंतर 500 आणि 1000 रुपयांचा नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यानंतर सरकारने नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. यात 500 आणि नवीन 2 हजार रुपयांची नोट सुरु केली होती.

यापूर्वी कधी कधी नोटबंदी झाली?

भारतात यापूर्वी 100, 5000 आणि 10 हजार रुपयांची नोट बंद झाली होती. त्यानंतर 500 आणि 1000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्यात आली होती. आरबीआयने 10 हजार रुपयांची नोट 1938 साली छापली होती. पण जानेवारी 1946 मध्ये ही नोट बंद करण्यात आली. त्यानंतर 1954 मध्ये 10 हजार रुपयांची नोट चलनात आली. पण 1978 मध्ये चलनातून हद्दपार करण्यात आली.

1946 मध्ये आरबीआयने 500, 1000 आणि 10000 रुपयांची नोट बंद केली. त्यानंतर 1954 साली 1000, 5000 आणि 10000 रुपयांची नोट चलनात आली. जानेवारी 1978 मध्ये बंद करण्यात आल्या. त्यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्या. पण 8 नोव्हेंबर 2016 मध्ये चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर 2017 मध्ये 500 आणि 2 हजार रुपायांची नोट चलनात आली. यापैकी आता 2 हजार रुपायांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

23 मे 2023 पासून नोट बदलण्याची प्रक्रिया

दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत 23 मे पासून जमा करू शकता. जवळ असलेल्या नोटा कोणत्याही बँकेत किंवा शाखेत बदलू शकता. एका वेळी 20 हजार रुपयांपर्यंत नोटा बदलू शकता. ही प्रक्रिया 23 मे पासून 30 सप्टेंबरपर्यंत असेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.