एका डब्याची AC स्पेशल ट्रेन का निघाली…कारण समजल्यानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
अपघातस्थळ दोन बोगद्यांच्या मध्ये होते. त्यामुळे एखादे वाहन त्या ठिकाणी जाणे शक्य नव्हते. त्यामुळे भोपाळवरून त्या बछड्यांसाठी विशेष ट्रेन पाठवण्यात आली. 132 किलोमीटर अंतर कापल्यावर दोन बछड्यांसह तिची आई त्या ठिकाणी होती. मग त्यांना ट्रेनमध्ये बसवण्यात आले. त्यांना भोपाळमध्ये आणले गेले. आता त्या बछड्यांची प्रकृती चांगली आहे.
भारतीय रेल्वेने प्रवास करणारे लाखो लोक आहेत. रेल्वेमुळे त्यांचा प्रवास कमी पैसांमध्ये चांगला होतो. विमान प्रवासापेक्षाही रेल्वे प्रवासाला प्राधान्य देणारे अनेक लोक आहेत. सोशल मीडियावर एका डब्याच्या स्पेशल एस रेल्वेची चर्चा सुरु होत आहे. या रेल्वेने जे काम केले, त्यामुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे. मध्य प्रदेश सरकार आणि रेल्वेचे आभार मानले जात आहे. रेल्वेचे हे अभियान 3 तास 20 मिनिटे सुरु होते.
दोन बछडे जखमी, एकाचा मृत्यू
मध्य प्रदेश प्रदेशातील सीहोर जिल्ह्यात वाघाच्या दोन जखमी बछड्यांना आणण्यासाठी ही स्पेशल ट्रेन चालवण्यात आली. 15 जुलै रोजी सीहोर जिल्ह्यातील बुदानी मिडघाट रेल्वे ट्रॅकवर तीन वाघांच्या बछड्यांना रेल्वेची धडक बसली. या घटनेत एका बछड्याचा मृत्यू झाला. तसेच दोन बछडे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी पोहचली. दोन बछड्यांची परिस्थिती पाहिल्यावर त्या ठिकाणी उपचार शक्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यांना भोपाळला घेऊन जावे लागणार होते.
मध्य प्रदेश सरकार की तत्परता व संवेदनशीलता से रेलवे ट्रेक पर घायल हुए बाघिन के दो शावकों को समय पर उपचार मिलना प्रशंसनीय है।सीहोर के बुधनी में मिडघाट रेलवे ट्रेक पर हुई दुर्घटना में मध्यप्रदेश सरकार और @RailMinIndia ने समन्वय के साथ बेहद कम समय में एक डिब्बे की स्पेशल ट्रेन की… pic.twitter.com/bFYYFFXfE2
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) July 16, 2024
यामुळे स्पेशल रेल्वे…
अपघातस्थळ दोन बोगद्यांच्या मध्ये होते. त्यामुळे एखादे वाहन त्या ठिकाणी जाणे शक्य नव्हते. त्यामुळे भोपाळवरून त्या बछड्यांसाठी विशेष ट्रेन पाठवण्यात आली. 132 किलोमीटर अंतर कापल्यावर दोन बछड्यांसह तिची आई त्या ठिकाणी होती. मग त्यांना ट्रेनमध्ये बसवण्यात आले. त्यांना भोपाळमध्ये आणले गेले. आता त्या बछड्यांची प्रकृती चांगली आहे.
सीहोर जिले में हुई दुर्घटना में घायल बाघ शावकों को उपचार हेतु स्पेशल ट्रेन से भोपाल लाया गया है। इस मामले में जिला प्रशासन की संवेदनशीलता सराहनीय है।@RailMinIndia ने मामले की संवेदनशीलता को समझते हुए त्वरित निर्णय लिया और रेस्क्यू हेतु एक डिब्बे की स्पेशल ट्रेन की व्यवस्था की।… pic.twitter.com/kKoUkO9VTJ
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 16, 2024
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटले…
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटले की, ‘मध्यप्रदेश सरकारची तत्परता व संवेदनशीलतेमुळे रेल्वे ट्रॅकवर जखमी झालेल्या बछड्यांना वेळेवर उपचार मिळाले. मध्य प्रदेश सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने एका डब्यांची रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. दोन्ही बछड्यांवर भोपाळमध्ये उपचार सुरु आहे. सरकारच्या या पावलाचे सोशल मीडियावर चांगले कौतूक होत आहे.