Parth Chaterjee: अर्पिताच्या घरी सापडले दोन सेक्स टॉय, पार्थ चॅटर्जींची टिंगल करत अभिनेत्री म्हणाली..
अर्पिताच्या फ्लॅटवर सेक्स टॉईज मिळाल्याची बातमी समोर आल्यानेतर, बांगला अभिनेत्री श्रीलेखा मित्राने या प्रकरणाची मजा घेत या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यासोबत तिने ट्विटही केले आहे. त्यात लिहिले आहे की- अरे, पार्थबाबू इच्छा करु शकत नव्हते का? वय नो बार, जात नो बार, सेक्स बार बार, पार्थ अपयशी ठरले का? देशाला हे जाणून घ्यायचे आहे.
कोलकाता – पश्चिम बंगालच्या (w. Bangal)शिक्षक भरती भ्रष्टाचार प्रकरणात ईडीकडून वेगवेगळ्या दिशेने या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या सगळ्यात प. बंगालचे उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी (Parth Chatterjee) यांना अटक करण्यात आली असून, त्यांची मंत्रिमंडळातूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. इतकेच नाही तर तृममूल काँग्रेसमधूनही त्यांना हद्दपार करण्यात आले आहे. पार्थ चॅटर्जी यांची नीकटवर्तीय अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) हिच्या घरातून कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम आणि दागिने ईडीला छाप्यात सापडले आहेत. अर्पिताच्या दोन फ्लॅटमधून 50 कोटी रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. तिच्या इतरही फ्लॅट्सवर छापेमारी सुरु आहे. ईडीच्या छापेमारीत अर्पिताच्या घरी दोन सेक्स टॉयही सापडले आहेत. हे सेक्स टॉईज कुणी खरेदी केले अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी यावरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होतो आहे की, जर हा फ्लॅट अर्पिताचा होता तर ती या सेक्स टॉईजचा उपयोग करीत होती का? की या फ्लॅटमध्ये दुसरे कुणी राहत होते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
अभिनेत्री श्रीलेखाने अर्पिता आणि पार्थ यांची केली टिंगल
अर्पिताच्या फ्लॅटवर सेक्स टॉईज मिळाल्याची बातमी समोर आल्यानेतर, बांगला अभिनेत्री श्रीलेखा मित्राने या प्रकरणाची टिंगल करत या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यासोबत तिने ट्विटही केले आहे. त्यात लिहिले आहे की- अरे, पार्थबाबू इच्छा करु शकत नव्हते का? वय नो बार, जात नो बार, सेक्स बार बार, पार्थ अपयशी ठरले का? देशाला हे जाणून घ्यायचे आहे.
अर्पिताच्या घरातून मिळाल्या या वस्तू
मिळालेल्या माहितीच्या आधारे, छापेमारीच्या काळात अर्पिताच्या फ्लॅटमध्ये सोने आणि हिऱ्याच्या अंगठ्या मिळाल्या आहेत. ज्यावर इंग्रजीत पी असे लिहिलेले होते. त्याशिवाय चांदीचे एक मोठे भांडेही जप्त करण्यात आले आहे. या भांड्यात दीप लावल्याने येणारी पीढी चांगली होते, अशी श्रद्धा आहे. पतीला सोडून आलेल्या अर्पिताच्या घरात या सगळ्या वस्तू मिळाल्याने आश्चर्य वाढले आहे.
काय आहे पूर्ण प्रकरण?
पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या वेगवेगळ्या घरांवर छापे टाकण्यात आले होते. यात अर्पिताच्या घरातून पैशांचे डोंगर सापडले आहेत. पहिल्या घरातून 21 कोटी तर दुसऱ्या घरातून 29 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय 4 कोटी रुपयांचे दागिने आणि 20 मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. सध्या अर्पिता आणि पार्थ हे दोघेही ईडीच्या कोठडीत असून त्यांची चौकशी करण्यात येते आहे.
काय आहे शिक्षक भरती घोटाळा?
2016 साली प. बंगालमध्ये स्कूल सेवा आयोगात शिक्षकांच्या भरती साठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. 2017 साली त्याचा निकाल आला तेव्हा सिलिगुडीची बबिला सरकारचे नाव पहिल्या टॉप 20 मध्ये होते. त्यानंतर आयोगाने ही यादी रद्द केली. आयोगाने नंतर दुसरी यादी जाहीर केली. त्यात बबितापेक्षा 16 अंक कमी असलेल्या अंकिता अधिकारी हिचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. मंत्री असलेल्या परेश अधिकारी यांची अंकिता ही मुलगी आहे. त्यानंतर बबिता आणि इतर काही जणांनी या प्रकरणात हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणात सीबीायने पार्थ चॅटर्जी यांची चौकशी केली. 2016 साली ते शिक्षणमंत्री होते. यात पैशांची अफरातफरी झाल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात ईडीची एन्ट्री झाली. त्यानंतर इडीने पार्थ आणि त्यांच्या नीकटवर्तीयांच्या घरी छापेमारी केली.