शरद पवार-एकनाथ शिंदे यांच्यातील बैठकीतील चर्चेबाबत उद्धव ठाकरे यांचे धक्कादायक वक्तव्य

शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध चांगले आहेत. गौतम अदानी यांनी बारामतीमध्ये येऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर गुजरातमध्ये शरद पवार गौतम अदानी यांना भेटले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्या धारावी प्रकल्पावरुन रान उठवले आहे. सातत्याने ते टीका करत आहेत.

शरद पवार-एकनाथ शिंदे यांच्यातील बैठकीतील चर्चेबाबत उद्धव ठाकरे यांचे धक्कादायक वक्तव्य
शरद पवार एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 07, 2024 | 9:00 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीबाबत दिल्ली दौऱ्यावर असलेले शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच भाष्य केले आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवार-एकनाथ शिंदे बैठक आणि शरद पवार-गौतम अदानी भूमिका याबाबत वक्तव्य केले आहे. त्यावरुन महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही, असे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली, त्याबाबत आम्हाला काहीच माहीत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणत एकाप्रकारे आपली नाराजी बोलून दाखवली. शरद पवार यांनी 3 ऑगस्ट आणि 22 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यावर यामुळेही नाराज

उद्धव ठाकरे दिल्लीत पत्रकारांशी बोलताना उद्योजक गौतम अदानी यांच्याही मुद्दा उपस्थित केला. गौतम अदानी यांच्याबाबत शरद पवार यांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध चांगले आहेत. गौतम अदानी यांनी बारामतीमध्ये येऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर गुजरातमध्ये शरद पवार गौतम अदानी यांना भेटले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्या धारावी प्रकल्पावरुन रान उठवले आहे. सातत्याने ते टीका करत आहेत.

पक्षातून बाहेर गेलेले मदत करु शकतात

पक्षातून बाहेर गेलेल्या लोकांना पुन्हा संधी मिळणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, पक्षातून बाहेर गेलेले परत येण्याऐवजी त्यांना तिकडूनच मदत करण्याचे सांगता येईल, असे ठाकरे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांनाही घेरले. देशात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाली तरी परतीचे दौर कापावे लागतील, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

आज काँग्रेस नेत्यांना भेटणार

दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहे. या भेटीच्या वेळी राज्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे करणार आहे. उद्धव ठाकरे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी (शपा) पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर घेण्यात यावा, अशी भूमिका काँग्रेसची असल्याचे म्हटले जात आहे.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.