आठ राज्यपाल बदलले, केंद्रीय मंत्री आता कर्नाटकचे गव्हर्नर, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला वेग
थावरचंद गेहलोत कर्नाटकचे राज्यपाल, हरी बाबू कंभमपती (Hari Babu Kambhampati) मिझोरमचे राज्यपाल, मंगुभाई छगनभाई पटेल (Mangubhai Chhaganbhai Patel ) मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर (Rajendra Vishwanath Arlekar) यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली (Union Cabinet Expansion) सुरु असतानाच 8 राज्यांसाठी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गोवा, त्रिपुरा, झारखंड, हरियाणा आणि मिझोरम या राज्यांसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवीन राज्यपाल नेमले आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री थावरचंद गहलोत (Thaawarchand Gehlot) यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Union Cabinet Expansion Minister Thaawarchand Gehlot appointed as Governor of Karnataka)
नवीन राज्यपाल कोण?
थावरचंद गेहलोत कर्नाटकचे राज्यपाल, हरी बाबू कंभमपती (Hari Babu Kambhampati) मिझोरमचे राज्यपाल, मंगुभाई छगनभाई पटेल (Mangubhai Chhaganbhai Patel ) मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर (Rajendra Vishwanath Arlekar) यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
President appoints Thaawarchand Gehlot as Governor of Karnataka, Hari Babu Kambhampati as Governor of Mizoram, Mangubhai Chhaganbhai Patel as Governor of Madhya Pradesh, and Rajendra Vishwanath Arlekar as Governor of Himachal Pradesh pic.twitter.com/ZA1GrFrgLV
— ANI (@ANI) July 6, 2021
मिझोरमचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई (PS Sreedharan Pillai ) यांची गोव्याचे राज्यपाल, हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य (Satyadev Narayan Arya) यांची त्रिपुराचे राज्यपाल, त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची झारखंडचे राज्यपाल, तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारु दत्तात्रय (Bandaru Dattatraya) यांची हरियाणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Mizoram Governor PS Sreedharan Pillai appointed as Goa Governor, Haryana Governor Satyadev Narayan Arya appointed as Tripura Governor, Tripura Governor Ramesh Bais appointed as Jharkhand Governor & Himachal Pradesh Governor Bandaru Dattatraya appointed as Haryana Governor
— ANI (@ANI) July 6, 2021
कर्नाटकच्या राज्यपालपदी थावरचंद
भाजपचे ज्येष्ठ नेते वाजूभाई वाला (Vajubhai Vala) यांच्या जागी थावरचंद गहलोत यांना कर्नाटकच्या राज्यपालपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. वाजूभाई वाला हे 2014 पासून म्हणजेच जवळपास गेली सात वर्ष कर्नाटकचे राज्यपाल म्हणून काम करत होते. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांची नियुक्ती झाल्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची खुर्ची रिकामी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणाची वर्णी लागते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
थावरचंद गहलोत कोण आहेत?
थावरचंद गहलोत सलग दुसऱ्यांदा राज्यसभा खासदार संसदीय मंडळ आणि भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य मोदी सरकारमध्ये 2014 पासून सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री 1996 ते 2009 पर्यंत मध्य प्रदेशातील शाजापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार
दुसरीकडे, मध्य प्रदेशच्या राज्यपालपदाची धुरा गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल (Anandiben Patel) यांच्याकडे होती. त्यांच्या जागी आता मंगुभाई छगनभाई पटेल यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर गोव्याच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सांभाळत होते.
संबंधित बातम्या :
येत्या 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार?, राणे, हिना गावित यांचा समावेश होणार?
नारायण राणेंना तातडीने दिल्लीला बोलावणं, केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान निश्चित
(Union Cabinet Expansion Minister Thaawarchand Gehlot appointed as Governor of Karnataka)