नवी दिल्ली: संसदेचं (Parliament Winter Session) हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. लोकसभेत (Lok Sabha ) कोरोना विषाणू संसर्गावर (Corona Virus) चर्चा सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी कोरोना संदर्भात लोकसभेत निवेदन केलं. मनसुख मांडवीय यांनी आम्ही राज्यांकडे ऑक्सिजनमुळं किती जण दगावले असल्याची माहिती मागवली होती, असं सांगितलं. मात्र, केवळ 19 राज्यांनी माहिती दिली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र सरकारनं ऑक्सिजन अभावी दगावलेल्या रुग्णांची माहिती दिली नसल्याचं मनसुख मांडवीय म्हणाले. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.
मनसुख मांडवीय यांनी ॲाक्सिजनमुळे किती कोरोना रूग्ण दगावले याची माहिती अद्याप महाराष्ट्र सरकारने दिली नाही, अशी माहिती दिली. केंद्र सहरकारला केवळ 19 राज्यांनी माहिती दिली. त्यात महाराष्ट्राचा सहभाग नाही, असंही केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले.
मनसूख मांडवीय म्हणाले की, आम्ही राज्यांना ॲाक्सिजन अभावी कितीजण दगावले असल्याची माहिती मागवली होती. पण, केवळ 19 राज्यांनी माहिती दिली. त्यात केवळ पंजाबनं सांगितले की 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली, असं मनसूख मांडवीय म्हणाले.
अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, दमण दीव, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, ओडिशा, आसाम, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, नागालँड, सिक्कीम त्रिपुरा, झारखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी माहिती दिली.
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी ऑक्सिजन अभावी किती जणांचा मृत्यू झाला यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत माहिती दिली.
लोकसभेत कोरोना विषाणू संसर्गावर चर्चा सुरु असून कालच्या दिवशी ऐतिहासिक चर्चा पार पडली. काल रात्री सव्वा बारा वाजेपर्यंत सुरू लोकसभेत चर्चा होती. मध्यरात्री लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. आज पुन्हा कोरोनावर चर्चा सुरु आहे. काल दिवसभरात 74 खासदारांनी चर्चेत सहभाग घेतला. शिवसेनेतर्फे विनायक राऊत यांनी लोकसभा कामकाजात सहभाग घेतला. पीएम केअरमधून देण्यात आलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स बंद असल्याची माहिती राऊत यांनी लोकसभेत दिली होती.
इतर बातम्या:
Union Health Minister Mansukh Mandaviya said Maharashta not gave information about corona patients deaths due to lack of Oxygen gave answer at Lok Sabha