मोठी बातमी! काहीतरी मोठं घडणार? अमित शाह अॅक्शन मोडमध्ये, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिले आदेश
मोठी बातमी समोर येत आहे, पहलगाममध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन परदेशी नागरिक देखील होते. दरम्यान या हल्ल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे, काही तरी मोठं घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
अमित शाह यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढा अशा सूचना अमित शाह यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना या बैठकीमध्ये दिल्या आहेत. पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवा, यादी आल्यानंतर सर्वांना बाहेर काढा असे आदेश अमित शाह यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. अमित शाह यांनी बैठकींचा सपाटा लावला आहे. दरम्यान दुसरीकडे उत्तर काश्मीरमध्ये रात्रभर राफेल या लढावू विमानाच्या घिरट्या सुरू आहेत, तसेच भारत पाकिस्तानमधील अटारी बॉर्डर बंद करण्यात आली असून, राजस्थान सीमेवरील बीएसएफ फोर्सला देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता काहीतरी मोठं घडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या
पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे, सिंंधु नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे. सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज अमित शाह यांनी राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली, या बैठकीत राज्यातील पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, यादी समोर आल्यानंतर सर्वांना बाहेर काढा असा आदेश अमित शाह यांनी दिला आहे. लष्कर प्रमुखांनी देखील नियंत्रण रेषवरील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
दरम्यान भारताच्या या निर्णयानंतर आता पाकिस्तानने थयथयाट सुरू केला आहे. पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे, तसेच पाकिस्तानच्या बाजुची वाघा बॉर्डर देखील आता बंद करण्यात आली आहे.