Amit Shah: काँग्रेसचा देशातून तर कम्युनिस्ट पार्टीचा जगातून अस्त होत आहे, काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा
गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत मुख्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने नद्यांतील पाणी वाटप, समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षा, दळणवळण वीज आणि आपआपसातील संबंधांच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
तिरुअनंतपूरम – काँग्रेस पक्ष देशातून गायब होत आहे, तर जगातून कम्युनिस्ट पार्टी लुप्त आहे, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे केरळचे आगामी भविष्य भाजपाच असल्याचा दावाही त्त्यांनी केला आहे. अमित शाहा दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. या काळात ते राजधानी तिरुअनंतरपूरममध्ये दक्षिण क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीत अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. यासह ते इतरही काही कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. दक्षिण क्षेत्रीय परिषदेत आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि केंद्रशासित प्रदेश पुड्डेचरीचा समावेश आहे.
#WATCH | “Congress is vanishing from the country, the world is getting rid of communist parties. If Kerala has a future, it is BJP,” says Union Home Minister Amit Shah at the BJP SC conference in Thiruvananthapuram, Kerala pic.twitter.com/BUN8UP8mmJ
— ANI (@ANI) September 3, 2022
अमित शाहा यांचा केरळ दौरा कशासाठी ?
गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत मुख्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने नद्यांतील पाणी वाटप, समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षा, दळणवळण वीज आणि आपआपसातील संबंधांच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
देशात पाच क्षेत्रीय परिषदांची स्थापना 1957 साली करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री या पाच क्षेत्रीय परिषदांचे अध्यक्ष असतात. तर यजमान राज्याचे मुख्यमंत्री या परिषदेचे उपाध्यक्ष असतात.
लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु
भाजपा आणि विरोधकांकडून 2024साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु झाल्याची चिन्हे आहेत. बिहारमध्ये भाजपाची साथ सोडून जेडीयूच्या नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आगामी काळात विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार हे नितीश कुमार असतील असे सांगण्यात येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे सगळे मिळून विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा स्थितीत भाजपाला पुन्हा एकदा बहुमत हवे असल्याने, भाजपाचे वरिष्ठ नेते हे दक्षिणेकडील राज्यांवरही लक्ष ठेवून आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वीच पक्षात फाटाफूट सुरु असल्याचे दिसते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प. बंगाल, केरळ या राज्यातील डाव्यांचा प्रभावही कमी करण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे.