Anurag Thakur | केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे मतदारसंघात श्रमदान, ‘स्वच्छता अभियान’बद्दल केले मोठे आवाहन

| Updated on: Oct 01, 2023 | 8:21 PM

संपूर्ण देशभरात आज स्वच्छता अभियान हे राबवले जातंय. स्वच्छता अभियानमध्ये लोकांचा मोठा सहभाग हा बघायला मिळतोय. स्वच्छता अभियान ही मोठी चळवळ निर्माण होताना दिसतंय. आज अनेक ठिकाणी श्रमदान करण्यात आले.

Anurag Thakur | केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे मतदारसंघात श्रमदान, स्वच्छता अभियानबद्दल केले मोठे आवाहन
Follow us on

मुंबई : आज संपूर्ण देशभरात ‘स्वच्छता अभियान’ हे राबवले जातंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मन की बात या त्यांच्या कार्यक्रमात देशातील सर्व नागरिकांना मोठे आवाहन केले. नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या या अभियानाला लोकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसतंय. मोठ्या प्रमाणात लोक आपल्या शहरात आपल्या परिसरात  स्वच्छता अभियान राबवताना दिसले.

या स्वच्छता अभियानमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये युवकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी देखील या अभिनयामध्ये सहभाग घेतला. अनुराग ठाकुर यांनी हिमाचल प्रदेशातील हमीरपूर या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात स्वच्छता अभियान राबवले.

अनुराग ठाकुर यांनी सोशल मीडियावर त्यांच्या स्वच्छता अभियानची काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. यामध्ये काही लोकांसोबत मिळून अनुराग ठाकुर हे स्वच्छता करताना दिसत आहेत. या स्वच्छता अभिनयामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन अनुराग ठाकुर यांच्याकडून करण्यात आलंय.

अनुराग ठाकुर यांनी शेअर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर जनजागृतीतून स्वच्छता ही एक मोठी जनचळवळ बनली आहे. आज स्वच्छतेबाबत लोकांच्या वागण्यात बदल दिसून येत आहेत. आज सेवा पखवाडा कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू असलेले स्वच्छता अभियान कार्यक्रम अंतर्गत हमीरपूर लोकसभा मतदारसंघात श्रमदान करण्यात आले.

यावेळी सन्मानित जनता विशेष: युवकांनी स्वच्छता अभियानमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. अनुराग ठाकुर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, मला नक्कीच विश्वास आहे की देशातील प्रत्येक नागरिकाने आज एक तास श्रमदान केले. इतकेच नाही तर हा संकल्प घेऊन चालू की, प्रत्येक व्यक्ती एका आठवड्यातून किमान एक तास श्रमदान करेल.

जर हे केले तर आपले एका वर्षाला 100 तास स्वच्छता अभिनयासाठी लागतील. गेल्या काही वर्षांपासून आपण मोठ्या मोहिम बघत आहोत. मुळात म्हणजे लोकांनी घाण करणे कमी केले आहे आणि स्वच्छतेवर अधिक भर दिलाय. नक्कीच देशातील जनता ही अशक्यला शक्य करून दाखवेल. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील श्रमदान हे केले आहे.