‘भाभीजी पापड’ खा आणि कोरोनामुक्त व्हा, केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दावा
पापड खाल्यावर कोरोना होत नाही किंवा बाधित रुग्ण कोरोनामुक्त होतो, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल केला आहे (Union Minister Arjun Ram Meghwal Viral Video).
जयपूर : केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे (Union Minister Arjun Ram Meghwal Viral Video). या व्हिडीओत त्यांनी हातात पापडचं पॅकेट पकडलं आहे. ते पॅकेट ‘भाभीजी पापड’ कंपनीचं आहे. हे पापड खाल्यावर कोरोना होत नाही किंवा बाधित रुग्ण कोरोनामुक्त होतो, असा दावा त्यांनी केला आहे (Union Minister Arjun Ram Meghwal Viral Video).
‘भाभीजी पापड’ खाल्याने शरीरात कोरोना विषाणूविरोधात लढणारे अँटिबॉडी तयार होतात’, असा दावा अर्जुन राम मेघवाल यांनी केला आहे.
#CoronavirusAsOpportunity | Under the Atmanirbhar Bharat, a manufacturer has produced papad with the name ‘Bhabhi ji papad’ and it will be very helpful in fighting Coronavirus. My best wishes to them and I hope they will succeed,” says MoS Arjun Ram Meghwal pic.twitter.com/RZ4sQ1Vd94
— Journalism Untied (@JournalsmUntied) July 24, 2020
“एका व्यावसायिकाने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ‘भाभीजी पापड’ नावाने पापडची कंपनी सुरु केली. हे पापड कोरोनाविरोधात लढण्यासाठी मदत करतील. त्यामुळे ‘भाभीजी पापड’च्या व्यावसायिकाला माझ्याकडून शुभेच्छा. ते नक्की यशस्वी होतील”, असं अर्जुन राम मेघवाल म्हणाले.
Go Corona Go! Papad khake jaa! Eat Papad & Go! Union minister Arjun Ram Meghwal thinks Bhabhiji papad will be helpful to fight Corona virus! pic.twitter.com/tabSr8zdiT
— Vibhinna Ideas (@Vibhinnaideas) July 24, 2020
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
दरम्यान, जगभरात कोरोनावर लस शोधण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे अनेकजण कोरोनावर उपचारबाबत वेगवेगळे दावा करत आहेत. कोणत्याही खाद्य पदार्थाने कोरोनावर मात करता येऊ शकत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेकडून याआधीच स्पष्ट करण्यात आलं आहे. पण कोरोनाची लागण होऊ नये किंवा कोरोनावर मात करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवणं जरुरीचं आहे. त्यासाठी पौष्टिक अन्न खावे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
देशात कोरोनाबाधितांचा आकडा 12 लाखांच्या पार
दरम्यान, देशात कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड गतीने वाढत आहे. विशेष म्हणजे काल (23 जुलै) सर्वाधिक 49 हजार 310 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 740 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 12 लाखांच्या पार गेला आहे.