सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, संसदेवरील अशोक स्तंभावर आक्षेप घेणाऱ्यांना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे जोरकस उत्तर

ही कलाकृती तयार करणाऱ्या कलाकारांनी या राष्ट्रीय प्रतिकात कोणताही बदल केला नसल्याचा दावा केला आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही विरोधकांच्या टीकेचा पुरेपूर समाचार घेत विरोधकांची दृष्टी अयोग्य असल्याची टीका केली आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सलग काही ट्विट केले आहेत.

सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, संसदेवरील अशोक स्तंभावर आक्षेप घेणाऱ्यांना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे जोरकस उत्तर
विरोधकांना प्रत्युत्तर Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 8:12 PM

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) संसदेवरील भव्य अशोक स्तंभाच्या केलेल्या उद्घटानानंतर यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. या राष्ट्रीय प्रतिकाचे अनावरण मोदींनी का केले, यासोबतच प्रतिकाच्या मूळ रुपात बदल केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. नव्या अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीवरील सिंह हे अधिक उग्र असल्याची टीका करण्यात आली होती. हा राष्ट्रीय प्रतिकाचा अपमान असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. राष्ट्रीय जनता दल, तृणमूल या पक्षांनी ही टीका केली होती. मात्र ही कलाकृती तयार करणाऱ्या कलाकारांनी या राष्ट्रीय प्रतिकात कोणताही बदल केला नसल्याचा दावा केला आहे. केंद्रीय मंत्री (Cabinet Minister)हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri)यांनीही विरोधकांच्या टीकेचा पुरेपूर समाचार घेत विरोधकांची दृष्टी अयोग्य असल्याची टीका केली आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सलग काही ट्विट केले आहेत.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे उत्तर

प्रमाण आणि दृष्टीकोन भावना.सौदंर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असावे लागते, हे प्रसिद्ध आहे. शांत आणि रागाच्या बाबतही असंच काहीसं आहे. मूळ सारनाथमध्ये असलेला अशोक स्तंभ हा 1.6 मीटर उंच आहे तर नव्या संसद भवनात शीर्षस्थानी असलेले प्रतीक 6.5 मीटर उंचीचे आहे. मूळची अचूक प्रतिकृती नवीन इमारतीवर ठेवली तर ती क्वचितच दृष्टीपथात पडू शकते. ‘तज्ञांना’ हे देखील माहित असावे की सारनाथमध्ये ठेवलेले मूळ चिन्ह जमिनीच्या पातळीवर आहे तर नवीन चिन्ह जमिनीपासून 33 मीटर उंचीवर आहे. दोन संरचनांची तुलना करताना कोन, उंची आणि प्रमाणाची दक्षता घेणेही आवश्यक आहे. जर एखाद्याने सारनाथ चिन्ह खालून पाहिले तर ते चर्चा केल्याप्रमाणे शांत किंवा रागावलेले दिसेल. सारनाथ बोधचिन्हाचा आकार वाढवायचा ठरवले किंवा संसदेच्या नवीन इमारतीवरील बोधचिन्हाचा आकार कमी केला, तरी दोन्हीही समान आहेत, त्यात काहीही फरक दिसणार नाही.

नव्या मूर्तीचे डिझायनर यांनीही केला इन्कार

नव्या संसद भवनावर भव्य अशोक स्तंभाची उभारणी ज्यांनी केली, ते डिझायनर सुनील देवरे आणि रोमिएल मोसेस यांनीही या प्रतिकृतीह काहीही फरक नसल्याचे जोर देऊन सांगितले आहे. या मुद्द्याकडे नेमके लक्ष दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. अशोक स्तंभावरील सिंहांप्रमाणेच नव्या सिंहांचा आकार आहे. बघणाऱ्यांच्या त्यांच्या त्यांच्या व्याख्या असू शकतात असेही त्यांनी सांगितले आहे. ही मोठी मूर्ती आहे, ती खालच्या बाजूने पाहताना वेगळी दिसू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ही कलाकृती तयार करण्याचा अभिमान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.