AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रमोशन, टेरिटोरियल आर्मीमध्ये बनले कॅप्टन!

अनुराग ठाकूर हे 2016 मध्ये प्रादेशिक सैन्याशी जोडले गेले आहेत. त्यावेळी ते लेफ्टनंट या पदावर नियुक्त झाले होते. आता त्यांची बढती करण्यात आली असून त्यांना कॅप्टन पद देण्यात आलं आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रमोशन, टेरिटोरियल आर्मीमध्ये बनले कॅप्टन!
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 5:50 PM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रमोशन झालं आहे. तशी माहिती त्यांनी स्वत: सोशल मीडियाद्वारे दिली आहे. हे प्रमोशन राजकारणातील नाही तर प्रादेशिक सेन्यातील म्हणजेच Territorial Army मधील आहे. अनुराग ठाकूर हे 2016 मध्ये प्रादेशिक सैन्याशी जोडले गेले आहेत. त्यावेळी ते लेफ्टनंट या पदावर नियुक्त झाले होते. आता त्यांची बढती करण्यात आली असून त्यांना कॅप्टन पद देण्यात आलं आहे.(Anurag Thakur promoted to Captain in the Territorial Army)

अनुराग ठाकूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. “जुलै 2016 मध्ये मी टेरिटोरियल आर्मीमध्ये रेग्युलर ऑफिसरप्रमाणे लेफ्टनंट पदावर नियुक्त झालो होते. आज मला सांगताना अभिमान वाटत आहे की, माझं प्रमोशन झालं असून मी कॅप्टन बनलो आहे. भारत माता आणि तिरंग्याप्रति असलेलं कर्तव्य पार पाडण्यासाठी मी तयार आहे. जय हिंद”, अशा शब्दात ठाकूर यांनी आपला आनंद व्यक्त केलाय.

टेरिटोरियल आर्मी म्हणजे काय?

टेरिटोरियल आर्मी हा भारतीय सैन्याचा एक भाग आहे. लष्कराला जिथेही गरज भासते तिथे टेरिटोरियल आर्मी आपलं यूनिट उपलब्ध करुन देते. टेरिटोरियल आर्मीमध्ये 18 ते 42 वर्यापर्यंतचे, पदवीचं शिक्षण घेतलेले, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असलेले नागरिक लेफ्टनंट पदावर रुजू होऊ शकतात. या आर्मीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे कमाईचं स्वत:चं साधन असलं पाहिजे. ही एक प्रकारे वॉलेंटियर सर्व्हिस आहे, कायमस्वरुपाची नोकरी नाही. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही टेरिटोरियल आर्मीसोबत जोडला गेलेला आहे.

जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये ऑपरेशन रक्षक, नॉर्थ-ईस्टमध्ये ऑपरेशन रायनो आणि ऑपरेशन बजरंगमध्ये टेरिटोरियल आर्मीने सक्रियपणे भाग घेतला होता. टेरिटोरियल आर्मीचे जवान आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार आणि सर्व्हिस अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आलं आहे.

इतर बातम्या :

राहुल गांधींनी शब्द पाळला, 12 वर्षाच्या मुलाला स्पोर्ट्स शूज पाठवले!

Weather Alert : हवामानात मोठे बदल, भारतातील ‘या’ भागांमध्ये पाऊस आणि गारपीटीची शक्यता

Anurag Thakur promoted to Captain in the Territorial Army

पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.