केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचा मोठा निर्णय, NBF ला स्वयंनियमन संस्था म्हणून मान्यता

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशनला स्वंय नियंत्रण संस्था म्हणून मान्यता दिली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून अशा प्रकारची मान्यता मिळणारी एनबीएफ ही एकमेव संस्था ठरली आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचा मोठा निर्णय, NBF ला स्वयंनियमन संस्था म्हणून मान्यता
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 11:45 AM

नवी दिल्ली: न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशन (एनबीएफ) च्या कार्यकारिणी सदस्य आणि वरिष्ठ सदस्यांनी नुकतीच यांची भेट घेतली. एनबीएफच्या शिष्टमंडळात अर्णब गोस्वामी, मुख्य संपादक, रिपब्लिक मीडिया नेटवर्क, टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ बरुण दास, टीव्ही 9 भारतवर्षचे न्यूज डायरेक्टर हेमंत शर्मा यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशनला स्वयंनियमन संस्था म्हणून मान्यता दिली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून अशा प्रकारची मान्यता मिळणारी एनबीएफ ही एकमेव संस्था ठरली आहे.

केंद्र सरकारनं न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशन (एनबीएफ) ला स्वयंनियमन संस्थेचा दर्जा मिळणारी पहिली संस्था ठरली आहे. सदस्यस्थितीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये पारदर्शकतेची मूलतत्तवे, स्वनियंत्रण असणारी एनबीएफ ही माध्यमांची एकमेव संस्था आहे. एनबीएफ अगोदरपासूनचं वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्रातील माध्यम समहू आणि त्यासंबंधी घटकामध्ये स्वनियंत्रित रचना मजबूत करण्यासी कार्यरत आहे.

NBF

एनबीएफचं प्रसिद्धीपत्रक

पीएनबीएसए ला देखील केंद्राची मान्यता

पीएनबीएसए ही संस्था देखील कार्यकरत असून ती एनबीएफचा घटक आहे. प्रोफेशनल न्यूज ब्रॉडकास्टर्स स्टँडर्डस अथॉरिटी ही संस्था देखील माध्यमातील पारदर्शकता आणि उत्तरादियत्व जपणारी संस्था आहे. पीएनबीएसए ही भारतातील राष्ट्रीय पातळीवरील माध्यमातील संकेत आणि निकष पूर्ण करणारी संस्था आहे. पीएनबीएसए आणि एनबीएफला मिळालेली मान्यता दोन्ही संस्थांच्या कार्यावर शिक्कामोर्तब करते, असं प्रसिद्धीपत्रकाद्वारे एनबीएफनं कळवलं आहे. तर, एनबीएफनं सदस्य असलेल्या माध्यम समुहांचा आधारस्तंभ बननण्याचा कामं केलं असल्याचं सांगण्यात आलंय. केबल टेलिव्हिजन नेटवर्क अ‌ॅक्ट अंतर्गत पीएनबीएसए नोंदणीकृत आहे.

NBF1

एनबीएफचं प्रसिद्धीपत्रक

अर्णब गोस्वामी काय म्हणाले?

NBF चे अध्यक्ष अर्णब गोस्वामी यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून एनबीएफला मान्यता मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. “NBF च्या नियामक मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो ज्यांच्या मुळं ही गोष्ट एनबीएफला मिळाली, असं अर्णब गोस्वामी म्हणाले. आपली लोकशाही बळकट करण्यात आणि त्याला आणखी उंचीवर नेण्यात माध्यमांची महत्वाची भूमिका आहे. माध्यमांच्या स्वयं-नियमनची चौकट मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. NBF सातत्यानं ते करत आलं आहे. एनबीएफला लोकशाही रचना आणि देशभर असलेल्या सदस्यांबद्दल अभिमान आहे, असही अर्णब गोस्वामी म्हणाले. देशभरातील विविध भाषा, गतिशील स्वरूप आणि वैविध्यपूर्ण प्रेक्षक यांना जोडून ठेवण्याचं काम एनबीएफ करते. भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ ओळखल्या जाणाऱ्या माध्यम या स्तंभाला मजबूत करण्यासाठी एकत्र येणं ही आमची वचनबद्धता असून ती पूर्ण करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असं गोस्वामी म्हणाले. माध्यमांमध्ये स्वयं-नियमन अधिक बळकट करण्यासाठी एनबीएफ माहिती आणि प्रसारण मंत्रालयासोबत काम करत राहील, असंही अर्णब गोस्वामी यांनी सांगितलं.

एनबीएफचे सरचिटणीस जय कृष्णा यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून स्वयं निंयत्रण संस्था म्हणून एनबीएफला मान्यता मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयायानं आमच्या संस्थेच्या सदस्यांवर विश्वास व्यक्त करत मान्यता दिली. न्यूज ब्रॉडकास्टिंगच्या क्षेत्रात आम्ही नक्कीच नवनवी यशाची शिखरं पादाक्रांत करु. लोकशारी रचना, स्व नियंत्रणातील गुणवत्ता आणि सत्य भारतातील विविध भाषांमधील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू ,असं जय कृष्णा म्हणाले.

अनुराग ठाकूर यांना भेटलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य

एनबीएफच्या शिष्टमंडळात अर्णब गोस्वामी, मुख्य संपादक, रिपब्लिक मीडिया नेटवर्क, टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ बरुण दास, टीव्ही 9 भारतवर्षचे न्यूज डायरेक्टर हेमंत शर्मा, प्राग न्यूजचे संस्थापकआणि व्यवस्थापकीय संचालक संजीव नारायण, प्राइड ईस्ट एंटरटेनमेंच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रिनिकी भुईया, आयटीव्ही नेटवर्कचे संस्थापक आणि प्रवर्तक कार्तिकेय शर्मा, फोर्थ डायमेंशनचे सीईओ शंकर बाला, न्यूज नेशनचे मुख्य संपादक मनोज गारोला, एमएचवनचे अध्यक्ष महेंद्र भटला, न्यूजफर्स्ट कन्नड व्यवसाय प्रमुख दिवाकर एस, एनबीएफचे सरचिटणीस आर. जय कृष्णा उपस्थित होते.

एनबीएफच्या सदस्य वाहिन्या

24 न्यूज, Alamai Sahara, CVR इंग्रजी, CVR हेल्थ, CVR न्यूज, DA न्यूज प्लस, DY365, गुलिस्तान न्यूज, IBC24, IND 24, इंडिया न्यूज गुजरात, इंडिया न्यूज हरियाणा, इंडिया न्यूज हिंदी, इंडिया न्यूज MPCG, इंडिया न्यूज पंजाबी, इंडिया न्यूज राजस्थान, इंडिया न्यूज UP, खबर फास्ट, MH वन, NEWS9, न्यूज फर्स्ट कन्नड़, न्यूज लाइव, न्यूज नेशन, न्यूजX, नॉर्थ ईस्ट लाइव, नॉर्थ ईस्ट न्यूज, OTV, पराग न्यूज, Puthiyathalaimurai, रिपब्लिक बांग्ला, रिपब्लिक भारत, रिपब्लिक TV, सहारा समय, समय बिहार, समय महाराष्ट्र, समय MPCG, समय राजस्थान, समय UP, TV5 कन्नड़, TV5 तेलुगु, TV9 भारतवर्ष, TV9 गुजराती, TV9 कन्नड़, TV9 मराठी, TV9 तेलुगु आणि V6 या वाहिन्यांचा समावेश एनबीएफमध्ये आहे.

इतर बातम्या

लोकशाहीनं चालणाऱ्या संस्थेचा भाग झाल्याचा आनंद, NBF संस्थेविषयी tv9 चे सीईओ बरुण दास यांची भावना

टीव्ही 9 नेटवर्क NBF सदस्यपदी, CEO बरुण दास यांची अनुराग ठाकूर यांच्याशी चर्चा, BARC रेटिंग पुन्हा सुरु करण्याची मागणी

Union Ministry of Information and Broadcasting has officially recognised the News Broadcasters Federation as self regulatory body

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.