नाकात ऑक्सिजनची नळी, उरात रुग्णसेवेची बांधिलकी; श्रीनगरच्या वाहनचालकाचा महामारीत अनोखा आदर्श

ऑक्सिजन सिलिंडर्स मिळवण्यासाठी अनेकांना उन्हातान्हात वणवण करावी लागत आहे. रुग्णांच्या वाट्याला ही भयानक परिस्थिती आल्याचे पाहून दम्याचे रुग्ण असलेले मंजूर अहमद स्वत: रुग्णसेवेसाठी घराबाहेर पडले आहेत. (Unique ideal of Srinagar driver in corona epidemic)

नाकात ऑक्सिजनची नळी, उरात रुग्णसेवेची बांधिलकी; श्रीनगरच्या वाहनचालकाचा महामारीत अनोखा आदर्श
नाकात ऑक्सिजनची नळी, उरात रुग्णसेवेची बांधिलकी
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 9:08 PM

श्रीनगर : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गाची चिंता कायम आहे. दैनंदिन रुग्णसंख्या अजूनही तीन लाखांच्याच वर नोंद होत आहे. त्यात बळींचा आकडाही धडकी भरवत आहे. एकीकडे ही भीषण परिस्थिती असून ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरत आहे. या संकटात श्रीनगरमधील एका वाहनचालकाची सामाजिक बांधिलकी उत्साह वाढवणारी तसेच कौतुकाचा विषय बनली आहे. कारण स्वत: दम्याचा रुग्ण असतानाही हा वाहनचालक नाकात ऑक्सिजनची नळी आणि गाडीच्या स्टेअरिंगवर दोन हात, अशा स्थितीत इतर रुग्णांना ऑक्सिजन पोहोचवण्याची सेवा करीत आहे. (Unique ideal of Srinagar driver in corona epidemic)

देशातील कोरोनाचा कहर आटोक्यात येत नसल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाहीय. ऑक्सिजन सिलिंडर्स मिळवण्यासाठी अनेकांना उन्हातान्हात वणवण करावी लागत आहे. रुग्णांच्या वाट्याला ही भयानक परिस्थिती आल्याचे पाहून दम्याचे रुग्ण असलेले मंजूर अहमद स्वत: रुग्णसेवेसाठी घराबाहेर पडले आहेत. ते कोरोनाच्या रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याची महान सेवा करीत आहेत.

मिडीया रिपोर्टनुसार, दम्याचे रुग्ण मंजूर अहमद हे ऑक्सिजनशिवाय राहू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांचे दोन्ही हात स्टेअरिंगवर व्यस्त आहेत. ते ऑक्सिजन सिलिंडर्सची डिलीव्हरी करणारी गाडी चालवतात. कोरोना महामारीत ठणठणीत असलेल्या लोकांनाही ऑक्सिजनची गरज भासत आहे. अशा संकटात मंजूर हे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गरजू लोकांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याची सेवा करीत आहेत.

नाकात ऑक्सिजनची नळी आणि शेजारच्या सीटवर ऑक्सिजन सिलिंडर

कोरोना महामारीत लोक आपल्या घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णसेवा तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या काळजीने मंजूर रस्त्यांवर आपली गाडी चालवत आहेत. नाकात ऑक्सिजनची नळी आणि शेजारच्या सीटवर ऑक्सिजन सिलिंडर, हे छायाचित्र पाहणार्यांचे मन सुन्न करीत आहे. याचवेळी मंजूर यांच्या धाडसी रुग्णसेवेचे तितकेच कौतुकही होत आहे. मंजूर यांना दर महिन्याला जवळपास 30 ते 40 ऑक्सिजन सिलिंडर्सची गरज भासते. जोपर्यंत हातपाय चालताहेत, तोपर्यंत स्वत: कमावण्याचा प्रयत्न करतोय. जेथे ऑक्सिजनची गरज लागते, तेथून मला फोन येतो आणि मला ऑक्सिजन सिलिंडर्स पोहोचवण्यासाठी गाडी बाहेर काढावी लागते, असे मंजूर सांगतात. संकट कितीही गंभीर असले तरी आपण खंबीर राहिले पाहिजे. जे संकटात हार मानतात, खचून जातात, त्यांच्यासाठी मंजूर यांचे उदाहरण संकटात डगमगून न जाण्याचा संदेश देत आहे. (Unique ideal of Srinagar driver in corona epidemic)

इतर बातम्या

“आधी जीव वाचवा मग क्रिकेट खेळत बसा”, PSL स्पर्धेवरून जावेद मियाँदाद संतापला

Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अभ्यासासाठी समिती स्थापन, 31 मे पर्यंत अहवाल देणार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.