Jyoti maurya | आलोकच्या ‘त्या’ डायरीत काय आहे? ज्योती मौर्यची कुठली नवीन सिक्रेट समोर येणार?

Jyoti maurya | विवाहबाह्य संबंधामुळे आधीच अडचणीत आलेली SDM ज्योती मौर्य आणखी फसणार? उत्तर प्रदेश सरकारने ज्योती मौर्यच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्राची दखल घेतली.

Jyoti maurya | आलोकच्या 'त्या' डायरीत काय आहे? ज्योती मौर्यची कुठली नवीन सिक्रेट समोर येणार?
Jyoti maurya Case
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 1:59 PM

लखनऊ : चर्चेत असलेली SDM अधिकारी ज्योती मौर्यच्या अडचणी आणखी वाढू शकतात. पती आलोक मौर्यच्या तक्रारीवरुन ज्योती मौर्य विरोधात उत्तर प्रदेश नियुक्ती विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रयागराज कमिशनर ज्योती मौर्यवरील आरोपांची चौकशी करणार आहेत. आलोक मौर्यने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून पैशाच्या व्यवहारासंबंधी तक्रार केली होती. माझी पत्नी भ्रष्टाचारामध्ये गुंतली आहे, असं त्या पत्रात म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांनी त्या पत्राची दखल घेत, तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

बरेलीच्या एका शुगर मिलमध्ये जीएमच्या पदावर असलेल्या एसडीएम ज्योती मौर्य आणि तिचा नवरा आलोक मौर्य यांचा वाद मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

ज्योतीने काय सांगितलेलं?

पती आलोक मौर्यने, ज्योती मौर्यचे गाजियाबादचा होमगार्ड कमांडट मनीष दुबेसोबत अफेअर सुरु असल्याचा आरोप केला होता. ज्योती आणि मनीष मिळून माझी हत्या करु शकतात, अशी भिती आलोकने व्यक्त केली होती. आलोकच्या आरोपानंतर शासनाने ज्योती मौर्य आणि मनीष दुबेकडून उत्तर मागितलं होतं. ज्योतीला लखनऊला येऊन स्पष्टीकरण द्याव लागलं होतं. आलोक बरोबर घटस्फोटाचा खटला सुरु आहे, असं ज्योतीने सांगितलं. म्हणूनच तो माझी बदनामी करतोय, असं ज्योती म्हणाली.

चौकशीत प्रियकर दोषी

मनीष दुबेची विभागीय चौकशी करण्यात आली. चौकशी आधीच त्याची गाजियाबादवरुन महोबा येथे बदली करण्यात आली. मनीष दुबे विरोधात प्रयागराज रेंजच्या डीआयजीने चौकशी केली होती. चौकशीत तो दोषी सुद्धा आढळला होता. अजूनपर्यतं मनीष दुबेवर कारवाई झालेली नाही. डीजी होमगार्डने शासनला चौकशी रिपोर्ट पाठवून मनीषवर कारवाई करण्याची शिफारस केली आहे.

ज्योतीने दर महिन्याला किती लाख कमावले?

आलोकने ज्योतीवर आरोप केले, त्यावेळी त्याने एक डायरी दाखवली होती. या डायरीत दर महिन्याला ज्योतीला वसुलीमधून मिळणाऱ्या पैशांची डिटेल आहेत असं त्याने सांगितलं होतं. डायरीतल्या हिशोबानुसार, ज्योतीने दर महिन्याला 6 लाख रुपये बेकायद पद्धतीने कमावले आहेत. त्या डायरीत काय आहे?

या डायरीचे काही फोटो समोर आले होते. त्यात पानाच्यावर आणि खाली एक स्वस्तिक आहे. शुभ-लाभ लिहिलेलं होतं. दर महिन्याला कुठून आणि कसे पैसे मिळाले त्याची एंट्री होती. स्वत: ज्योती मौर्यने एंट्री केली, असा आलोक मौर्यचा दावा होता. ज्योती आपल्या बेकायदा कमाईचा हिशोब या डायरीत ठेवते, असं आलोकने म्हटलं होतं.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...