‘त्यांचा’ सत्यानाश होईल; योगी आदित्यनाथांचा संताप

उत्तर प्रदेशातील माता-भगिनीच्या सन्मान आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचविण्याचा विचार सुद्धा करणाऱ्यांचा सत्यानाश होईल, असा संताप योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.

'त्यांचा' सत्यानाश होईल; योगी आदित्यनाथांचा संताप
Follow us
| Updated on: Oct 02, 2020 | 5:08 PM

लखनऊ: हाथरस येथे झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणावरून संपूर्ण देशात संतापाची लाट पसरलेली असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यावर अखेर भाष्य केलं आहे. (Yogi Adityanath on Womens Safety in UP) उत्तर प्रदेशातील माता-भगिनीच्या सन्मान आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचविण्याचा विचार सुद्धा करणाऱ्यांचा सत्यानाश होईल, असा संताप योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून हाथरस येथील घटनेवर भाष्य केलं आहे. उत्तर प्रदेशातील माता-भगिनींच्या सन्मान आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचविण्याचा विचार सुद्धा करणाऱ्यांचा सत्यानाश होईल. लोक भविष्यातही लक्षात ठेवतील अशी शिक्षा या लोकांना देऊ. राज्यातील माता-भगिनींच्या संरक्षण आणि विकासासाठी उत्तर प्रदेश सरकार वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प असून वचन आहे, असं ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

दरम्यान, आदित्यनाथ यांनी ट्विट करून महिलांच्या सुरक्षेची हमी दिली असली तरी हाथरस आणि बलरामपूर घटनेचा या ट्विटमध्ये उल्लेख केला नाही. तसेच आतापर्यंत आऱोपींविरोधात काय कारवाई केली? किंवा पोलिसांचा तपास कुठपर्यंत आला त्यावर काहीही भाष्य न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दिल्लीपासून सुमारे 200 किमीवर असलेल्या हाथरस गावातील एका मुलीवर 14 सप्टेंबरला चार ते पाच जणांनी बलात्कार केला. तसा आरोप मुलीच्या भावाने केला होता. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. “माझा मोठा भाऊ, आई आणि बहीण शेतात गेले होते. माझा भाऊ गुरांसाठी चारा घेऊन समोर आला. माझी आई आणि बहीण काम करत होते. त्याचवेळी चार ते पाच जण गुपचूप आले. त्यांनी माझ्या बहिणीच्या गळ्यात ओढणी टाकून तिला शेजारच्या शेतात जबरदस्तीने घेऊन गेले. माझी बहीण गायब असल्याचे कळताच माझ्या आईने तिचा शोध घेतला. पण ती शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने तिच्यावर बलात्कार झाल्याचे माझ्या आईला समजले,” असं तिच्या मोठ्या भावाने सांगितलं होतं. (Yogi Adityanath on Womens Safety in UP)

संबंधित बातम्या:

पंतप्रधान बोलत का नाहीत?; जनतेला हाथरसच्या घटनेचं सत्य सांगा; शिवसेनेची मागणी

देशात अराजक माजलंय; सरकारने चूक कबूल करावी; सुप्रिया सुळेंनी सुनावलं

यूपी पुन्हा गँगरेपने हादरली, बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

(Yogi Adityanath on Womens Safety in UP)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.