UPA हा दिल्लीतला विषय, जिल्हा-तालुका स्तरावरील नेत्यांनी यामध्ये पडू नये; राऊतांचा नाना पटोलेंवर पलटवार

ही गोष्ट महाराष्ट्रातील नेत्यांना उमजत नसेल तर त्यांना अभ्यास करण्याची गरज आहे. | Sanjay Raut Nana Patole

UPA हा दिल्लीतला विषय, जिल्हा-तालुका स्तरावरील नेत्यांनी यामध्ये पडू नये; राऊतांचा नाना पटोलेंवर पलटवार
तर भाजपचा पराभव कसा करणार, याचं उत्तरही द्या.
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 10:46 AM

नवी दिल्ली: संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदाचा विषय हा केंद्रातील चर्चेचा विषय आहे. राज्यातील किंवा जिल्हा-तालुका स्तरावरील नेत्यांनी यावर बोलू नये, असा शब्दांत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना प्रत्युत्तर दिले. UPA विषयी बोलण्यासाठी त्याचा भाग असलंच पाहिजे, हे गरजेचे नाही. या देशात भाजपविरोधात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी उभी करायची असेल तर UPA विषयी चर्चा झाली पाहिजे. ही गोष्ट महाराष्ट्रातील नेत्यांना उमजत नसेल तर त्यांना अभ्यास करण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. (Sanjay Raut hits back congress leaders Nana Patole)

संजय राऊत यांनी UPA चे अध्यक्षपद शरद पवार यांना मिळावे, अशी मागणी केली होती. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल विचारला होता. तसेच शिवसेना UPA चा भाग नाही, त्यामुळे संजय राऊत यांनी संबंध नसलेल्या विषयाबाबत बोलू नये, असे खडे बोलही सुनावले होते.

या टीकेला संजय राऊत यांनी नाना पटोले यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले. हा दिल्लीतील विषय आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी यामध्ये पडू नये. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी याविषयी काही बोलले तर आम्ही उत्तर देऊ. देशात विरोधी पक्षांची सक्षम आघाडी उभी राहिली नाही तर भाजपचा पराभव कसा करणार, याचं उत्तरही या नेत्यांनी दिल्लीत बसून द्यावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. त्यामुळे आता यावर नाना पटोले काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

‘राष्ट्रीय स्तरावरील काही नेते यूपीए 2 स्थापन करण्याच्या तयारीत’

काँग्रेसने यूपीएच्या अध्यक्षपदाचा हट्ट न सोडल्यास राष्ट्रीय स्तरावरील काही नेते यूपीए 2 स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. हीच चिंता असल्याने मी यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी केली. पण काँग्रेस पक्षाशिवाय यूपीए असूच शकत नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते, पण मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत: संजय राऊत

Thackery Govt meeting: ‘ आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, पण आता लढायला पाहिजे’

महाविकासआघाडीच्या गोटात वेगवान हालचाली; सुप्रिया सुळेंची सोनियांशी चर्चा, मुंबईतही नेत्यांची गुप्त खलबतं

(Sanjay Raut hits back congress leaders Nana Patole)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.