Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI Lite Payment Limit : युपीआय पेमेंटची लिमीट वाढली, आता एकाच वेळेस करू शकणार इतक्या रूपयांचा व्यवहार

युपीआय लिट ही UPI पेमेंटची सरलीकृत आवृत्ती आहे. हे 2022 मध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि RBI द्वारे सादर केले गेले. लहान व्यवहार जलद आणि सुलभ व्हावेत हा त्याचा उद्देश आहे.

UPI Lite Payment Limit : युपीआय पेमेंटची लिमीट वाढली, आता एकाच वेळेस करू शकणार इतक्या रूपयांचा व्यवहार
युपीआयImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 12:58 PM

नवी दिल्ली : लोकांनी युपीआय लिट (UPI Lite Limit) चा मोठ्या प्रमाणात वापर करावा यासाठी रिझर्व बँकेने काल एक मोठे पाऊल उचलले आहे. आरबीआयने युपीआय लिट मर्यादा 200 रुपयांवरून 500 रुपये केली आहे. म्हणजे आता तुम्ही पीनन टाकता युपीआय लिटद्वारे एकावेळी 500 रुपये पेमेंट करू शकता. चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, डिजिटल पेमेंटचा अनुभव वाढवण्यासाठी युपीआय लिटची मर्यादा वाढवली जात आहे जेणेकरून प्रत्येकजण त्याचा वापर करू शकेल. ते म्हणाले की, आता लोक पिन न टाकता 200 रुपयांऐवजी 500 रुपयांचा व्यवहार करू शकतील.

युपीआय लिट म्हणजे काय?

युपीआय लिट ही UPI पेमेंटची सरलीकृत आवृत्ती आहे. हे 2022 मध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि RBI द्वारे सादर केले गेले. लहान व्यवहार जलद आणि सुलभ व्हावेत हा त्याचा उद्देश आहे. युपीआय लिट द्वारे, तुम्ही आजपासून तुमचा पिन न टाकता रु. 500 चे एकवेळ पेमेंट करू शकता. त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या युपीआय लिट वॉलेटमध्ये एका दिवसात एकूण 4000 रुपये जोडू शकता.

युपीआय लिट वापरण्यासाठी, तुम्हाला कोणत्याही पेमेंट अॅपवर जावे लागेल. Phonepe, Google pay आणि Paytm प्रमाणे. अॅपमध्ये प्रवेश केल्यानंतर, तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन युपीआय लिट चा पर्याय शोधावा लागेल. यानंतर तुमची बँक निवडा आणि खाते सक्रिय करा. सक्रिय झाल्यावर, पुढच्या वेळी पेमेंट करताना युपीआय लिट चा पर्याय निवडा आणि त्याद्वारे पैसे भरा. लक्षात ठेवा, सध्या फक्त काही बँका युपीआय लिट ची सेवा देतात. तुमचे बँक खाते त्या निवडक बँकांमध्ये असेल तरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

हे सुद्धा वाचा

पेमेंट मर्यादा वाढवण्याव्यतिरिक्त, RBI लवकरच UPI ची सुविधा आणि पोहोच वाढवण्यासाठी नवीन वैशिष्ट्ये जोडणार आहे. यातील एक वैशिष्ट्य म्हणजे युपीआय लिटद्वारे नियर-फील्ड कम्युनिकेशन (NFC) तंत्रज्ञानाचा वापर करून ऑफलाइन पेमेंट करणे. हे वैशिष्ट्य लोकांना मर्यादित किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेल्या परिस्थितीतही डिजिटल पेमेंट करण्यास सक्षम करेल.

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.