UPSC CSE 2024 Final Result : यूपीएससीत मराठी झेंडा, अर्चित डोंगरे तिसरा, शक्ती दुबे टॉपर
केंद्रिय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी सिव्हील सेवा २०२४ परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत यंदा मराठी झेंडा फडकला असून मराठमोळा अर्चित डोंगरे तिसरा आला आहे.

UPSC CSE 2024 Final Result Declared: युपीएस्सी केंद्रिय लोकसेवा आयोग २०२४ च्या परीक्षेचा निकाल घोषीत करण्यात आला आहे. या अत्यंत कठीण मानल्या गेलेल्या परीक्षेत देशभरातील नऊ लाख उमदेवार कठोर मेहनत घेऊन परीक्षा देत असतात आणि मोजकेच हजार भर विद्यार्थी देशभरातून उत्तीर्ण होत असतात. यंदा युपीएसीमधून देशातून शक्ती दुबे ही पहिली आली आहे. तर महराष्ट्राचा अर्चित डोंगरे तिसरा आला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर हर्षिता गोयल उत्तीर्ण झाली आहे. युपीएससी संपूर्ण निकाल upsc.gov.in या वेबसाइट जाऊन तुमचा रोल नंबर आणि नाव टाकून पाहू शकता…
शक्ती दुबे टॉपर –




मुलाखती या तारखांना होणार
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम सिव्हील परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. शक्ती दुबे ही ऑल इंडिया पहिली रँक मिळवित देशभरातून टॉपर झाली आहे. उमेदवारांनी उत्तीर्ण झालेल्यांची यादी युपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहाता येणार आहे. आयोगाने एकूण 1009 उमेदवारांची शिफारस केली होती. त्यात जनरल कॅटेगरीत 335, EWS चे 109, ओबीसी गटाचे 318, एससीचे 160 आणि एससी श्रेणीचे एकूण 87 उमेदवार सामील आहे. यांच्या मुलाखती आता 7 जानेवारी 2025 ते 17 एप्रिल 2025 पर्यंत चालणार आहेत.
येथे पाहा व्हिडीओ –
मुख्य परीक्षेचे आयोजन सप्टेंबर २९२४ रोजी झाले होते. या यशस्वी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी बोलावले होते. मुलाखती एकूण २८४५ उमेदवार सामील झाले होते. यातील २४१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यूपीएससीने या २४१ उमेदवारांची उमेदवारी पुढील पडताळणी होईपर्यंत यादी राखून ठेवली आहे.
युपीएससीमध्ये टॉप टेन उत्तीर्ण झालेल्यांची यादी
- शक्ती दुबे,
- हर्षिता गोयल
- डोंगरे अर्चित पराग
- शाह मार्गी चिराग
- आकाश गर्ग
- कोम्मल पुनिया
- आयुषी बंसल
- राज कृष्ण झा
- आदित्य विक्रम अग्रवाल
- मयंक त्रिपाठी
UPSC CSE 2024 चा अंतिम निकाल असा पाहा –
यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईट upsc.gov.in या लिंकवर जावे
होम पेजवर दिलेल्या CSE २०२४ च्या अंतिम निकालाच्या लिंकवर क्लिक करावे
स्क्रीनवर एक PDF दिसेल
आता नाव आणि रोल नंबर टाकून सर्च करावे…