UPSC परीक्षेची तयारी करताना कोसळला दु:खाचा डोंगर, पण ती खचली नाही IAS होऊन दाखवलंच
UPSC Success Story : यूपीएससी परीक्षा पास होण्याचं स्वप्न अनेकांचं असलं तरी देखील मोजक्या लोकांनाच यात यश मिळतं. आयएएस होण्यासाठी खूप मेहनत तर घ्यावी लागतेच पण अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला अशीच एक यशोगाथा सांगणार आहोत.
UPSC Success Story : यूपीएससी परीक्षा पास होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. दिवसाला कमीत कमी ८ ते ९ तास अभ्यास करावा लागतो. जिद्द आणि चिकाटी असल्याशिवाय या परीक्षेत पास होणं कठीण आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका संघर्षाची स्टोरी सांगणार आहोत. पंजाबमधील मोगा येथे जन्मलेल्या रितिका जिंदाल हिच्या संघर्षाची ही स्टोरी आहे. तिने कधीच ज्या गोष्टी नाहीत त्याची तक्रार केली नाही. उलट ज्या आहेत त्यातच समाधानी राहून त्याच्याच मदतीने ही कठीण परीक्षा पास केली. रितिकाला तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो संघर्ष करावा लागला ते ऐकून तुम्हालाही अंगावर काटा येईल.
अभ्यासात आधीपासूनच हुशार
रितिका लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिने 10वी आणि 12वी परीक्षा देखील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. ती ग्रॅज्युएशनमध्येही अव्वल ठरली. पदवी परीक्षेत तिने ९५ टक्के गुण मिळवले होते. यानंतर रितिकाने यूपीएससीची तयारी सुरू केली.
रितिकासाठी तो काळ खूप कठीण
रितिका जेव्हा पहिल्यांदा UPSC परीक्षेसाठी बसली तेव्हाच तिच्या वडिलांना जिभेचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. अडचणी इथेच थांबल्या नाहीत. जेव्हा ती दुसरा प्रयत्न करत होती तेव्हा वडिलांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला. इतक्या अडचणी असताना देखील वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती खंबीरपणे उभी राहिली. रितिका पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचली होती.
रितिकाने 2018 मध्ये दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. तिने आपल्यातील उणिवा दुरुस्त केल्या आणि 88 व्या क्रमांकाने UPSC उत्तीर्ण झाले. अनेक अडचणी असतानाही रितिकाने आयएएस होऊन तिचे स्वप्न पूर्ण केले. हॉस्पिटलमध्ये वडिलांची काळजी घेत तिने UPSC ची तयारी केली होती.
UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ती IAS चे प्रशिक्षण घेत असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. हा तिच्यासाठी मोठा धक्का होता. इतकंच नाही तर रितिकाच्या आईचेही वडिलांच्या निधनानंतर अवघ्या दोन महिन्यांत निधन झाले. अशा प्रकारे आई-वडील दोघेही आपल्या मुलीचे यश पाहू शकले नाहीत.