वय वर्ष 24, नोकरी सोडून भारतवंशीय अमेरिकेच्या निवडणूक रिंगणात, निवडणुकीसाठी जमवले 2.80 लाख डॉलर

US 2024 elections indian-origin: रामास्वामी यांचे आई-वडील 1990 मध्ये तामिळनाडूमधून अमेरिकेत गेले. त्यांनी 2021 मध्ये स्टेनफोर्ड विद्यापीठातून संगणक शास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर कायद्याची पदवी त्यांनी घेतली.

वय वर्ष 24, नोकरी सोडून भारतवंशीय अमेरिकेच्या निवडणूक रिंगणात, निवडणुकीसाठी जमवले 2.80 लाख डॉलर
अश्विन रामस्वामी
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 11:56 AM

भारतात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी येणार आहे. भारताबरोबर यावर्षी अमेरिकेत निवडणूक होत आहे. अमेरिकेतील निवडणुकीत अनेक भारतवंशीय रिंगणात उतरले आहेत. परंतु एक २४ वर्षीय युवकाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भारतवंशीय असलेला के. अश्विन रामास्वामी अमेरिकेतील स्टेट सीनेटच्या निवडणूक रिंगणात उतरला आहे. त्यांचे वय फक्त 24 आहे. यावर्षीय जॉर्जियाच्या स्टेट निवडणुकीत ते उतरत आहेत.

Gen-Z मधील व्यक्ती

अश्विन रामास्वामी स्टेट सीनेटची निवडणूक लढवणारे ‘Gen-Z’ मधील पहिले भारतीय आहेत. ‘Gen-Z’ म्हणजे 1997 ते 2012 दरम्यान जन्म झालेला व्यक्ती आहे. अश्निन रामास्वामी यांनी निवडणूक लढण्यासाठी आतापर्यंत 2.80 लाख डॉलर म्हणजेच जवळपास अडीच कोटी रुपये फंड जमा केला आहे. ही रक्कम केवळ तीन महिन्यांत त्यांनी जमा केली आहे. 1 फेब्रुवारी ते 30 एप्रिल दरम्यान हा निधी जमा केला आहे. त्याचे विरोधक असलेले शॉन स्टिल याला त्यापेक्षा कमी रक्कम मिळाली आहे.

कंपनीत नोकरी सोडत राजकारणात

अश्विन रामास्वामी डेमोक्रेट पक्षाकडून जॉर्जियामधील डिस्ट्रिक्ट-48 मधून स्टेट सीनेटची निवडणूक लढणार आहे. या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे शॉन स्टिल खासदार आहेत. अश्विन रामास्वामी आयटी कंपनीत नोकरी करत होते. परंतु भारतीय अमेरिकन लोकांच्या सेवेसाठी त्यांनी नोकरी सोडून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत रामास्वामी म्हणाले की, मी आपल्या लोकांच्या सेवेसाठी सीनेट निवडणूक लढवत आहे. आमच्याकडे नवीन आवाज आहे. नवीन युवक आहेत. ते राजकारणाचा कोणताही गंध नसताना आणि राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात येतात.

कोण आहे अश्विन रामास्वामी?

रामास्वामी यांचे आई-वडील 1990 मध्ये तामिळनाडूमधून अमेरिकेत गेले. त्यांनी 2021 मध्ये स्टेनफोर्ड विद्यापीठातून संगणक शास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर कायद्याची पदवी त्यांनी घेतली. त्याचे आई-वडील दोन्ही जण आयटी विभागात आहे. रामास्वामी रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यासारखे धार्मिक ग्रंथ वाचून मोठे झाले.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.