Gautam Adani : अमेरिकेच्या आरोपांपासून धारावी प्रकल्पापर्यंत, गौतम अदानी यांचे थेट उत्तर

गौतम अदानी यांच्यावर एकीकडे वेगवेगळे आरोप होत असताना त्यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना याला उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आव्हाने आपल्याला अधिक मजबूत बनवतात. अमेरिकेतील आरोपांवर ते म्हणाले की, अदानी समूहाविरुद्ध कोणतीही एफसीपीए (फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस) कारवाई केली जाणार नाही. धारावी प्रकल्पावर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Gautam Adani : अमेरिकेच्या आरोपांपासून धारावी प्रकल्पापर्यंत, गौतम अदानी यांचे थेट उत्तर
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 10:04 PM

Gautam Adani : जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने आयोजित केलेल्या इंडिया जेम अँड ज्वेलरी अवॉर्ड्सच्या कार्यक्रमात बोलताना अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा हे देखील उपस्थित होते. मेळाव्याला संबोधित करताना, गौतम अदानी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि जागतिक प्रतिष्ठेला आकार देण्यासाठी रत्न आणि दागिने उद्योगाची महत्त्वपूर्ण भूमिका कशी आहे ती सांगितली.

अदानी म्हणाले की, ज्वेलरी उद्योग हे एक पॉवर हाऊस आहे. ज्यामुळे 50 लाख लोकांना रोजगार मिळते. आयटी क्षेत्राच्या बरोबरीचे हे क्षेत्र आहे. रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत 14% घट झाल्याबद्दल काळजी करण्याची गरज आहे. यावर काम करावे लागेल. प्रयोगशाळेत बनलेले हिरे वैज्ञानिक नवनिर्मितीद्वारे बाजारपेठेत व्यत्यय आणणारे बनले आहेत. अमेरिकेने त्यांना नैसर्गिक हिऱ्यासारखी ओळख दिली आहे. त्यांची किंमत नैसर्गिक हिऱ्यांपेक्षा कमी आहे. हा भविष्याचा हिरा आहे, जो आपल्याला स्वीकारावा लागेल.

अदानी म्हणाले की, दागिन्यांच्या डिझाईन आणि निर्मितीमध्ये मोठा बदल होणार आहे. आपल्या कारकिर्दीशी संबंधित एक किस्सा शेअर करताना, गौतम अदानी म्हणाले की हे त्या दिवसांबद्दल होते जेव्हा ते हिरे व्यापारात उद्योजक बनू लागले होते. त्यांचे ते पहिले पाऊल होते. एका जपानी क्लायंटसोबत झालेल्या डीलमध्ये त्यांना 10,000 रुपयांचे पहिले कमिशन मिळाले होते. भविष्य त्यांचा आहे जे आजच्या मर्यादा उद्याचा प्रारंभ बिंदू मानतात.

धारावी प्रकल्पांवर काय म्हणाले अदानी

विमानतळापासून झोपडपट्टी पुनर्विकासापर्यंतच्या शक्यता आम्ही पाहिल्या आहेत. माझ्यासाठी धारावी म्हणजे फक्त झोपडपट्टीचा पुनर्विकास नाही. शाश्वत भविष्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. यामुळे लाखो लोकांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी मिळेल. आज आम्ही देशातील सर्वात मोठे सौर पॅनेल उत्पादक आहोत. एकाच ठिकाणी जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प देखील आम्ही बांधला आहे.

अमेरिकेच्या आरोपांचा संदर्भ देत गौतम अदानी म्हणाले की, ‘अमेरिकेतून आमच्यावर काही आरोप झाले होते, पण मला हे स्पष्ट करायचे आहे की अदानी समूहातील कोणत्याही व्यक्तीला फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट (FCPA) अंतर्गत कोणत्याही आरोपांना सामोरे जावे लागणार नाही. नकारात्मकता झपाट्याने पसरते, पण ती आपली प्रगती थांबवू शकत नाही.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.