वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प समर्थकांचा धुडगूस, संसेदत घुसण्याचा प्रयत्न; पंतप्रधान मोदी म्हणाले…
अमेरिकेत उसळलेला हा हिंसाचार बघून अतीव दु:ख होत आहे. कायद्याप्रमाणे आणि शांततेत सत्तेचे हस्तांतरण झाले पाहिजे. | PM Modi
नवी दिल्ली: वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन संसदेबाहेर (US Capitol) उफाळलेल्या संघर्षाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करुन भाष्य केले आहे. अमेरिकेत उसळलेला हा हिंसाचार बघून अतीव दु:ख होत आहे. कायद्याप्रमाणे आणि शांततेत सत्तेचे हस्तांतरण झाले पाहिजे. बेकायदेशीर आंदोलने करुन लोकशाही प्रक्रियेत अडथळे आणणे कदापि योग्य नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. (PM Narendra Modi on US Capitol Hill siege)
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे अध्यक्षपदावरून पायउतार होण्यास नकार देत असल्यामुळे हा सारा प्रकार घडला आहे. अमेरिकन संसदेत गुरुवारी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज आणि सिनेटचे संयुक्त अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनात निवडणूक प्रक्रियेत जो बायडेन यांच्या विजयावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले जाणार होते.
Police say four people died as Trump supporters occupied the US Capitol in Washington DC. One woman was shot by the U.S. Capitol police as a mob tried to break through a barricaded door, and three died in medical emergencies, reports The Associated Press https://t.co/W1e3J1JkJf
— ANI (@ANI) January 7, 2021
मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण हार मानण्यास तयार नसल्याचे सांगत आपल्या समर्थकांना बुधवारी दुपारी वॉशिंग्टनमध्ये जमण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर वॉशिंग्टनमध्ये हिंसाचार सुरु झाला. ट्रम्प यांच्या काही समर्थकांनी तारेचे कुंपण तोडून अमेरिकन संसदेतही शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रम्प समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. यावेळी दंगल नियंत्रण पथकाच्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या वॉशिंग्टनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.
Distressed to see news about rioting and violence in Washington DC. Orderly and peaceful transfer of power must continue. The democratic process cannot be allowed to be subverted through unlawful protests.
— Narendra Modi (@narendramodi) January 7, 2021
डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊण्ट लॉक, कायमस्वरुपी बंदीचा इशारा
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना ट्विटरवर कायमची बंदी आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊण्ट बारा तासांसाठी, तर फेसबुकने 24 तासांसाठी लॉक केले आहे. नागरी अखंडत्वाबद्दल नियम मोडणारे तीन ट्विट्स डिलीट न केल्यास ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याचा इशारा ट्विटरने दिला.
संबंधित बातम्या:
अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती जो बायडेन यांना किती पगार मिळणार? जाणून घ्या
अमेरिकेत संसदेवर हल्लाबोल, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊण्ट लॉक, कायमस्वरुपी बंदीचा इशारा
(PM Narendra Modi on US Capitol Hill siege)