चीन, पाकिस्तानने घेतला धसका, भारताला मिळणार ‘सोनोबॉय’, समुद्रातील शत्रूला रोखण्यास भारताची मोठी डिल

US has approved sonobuoys to india: सोनोबॉयमुळे चीन आणि पाकिस्तानला धक्का बसला आहे. यामुळे समुद्रातील भारताची टेहाळणी आणखी मजबूत होईल. शत्रूच्या पाणबुड्या किंवा कोणत्याही हालचालींना आळा घालण्यास मदत होईल. विशेषतः चीनसाठी हा मोठा धक्का आहे. अलीकडेच आपली अत्याधुनिक पाणबुडी लाँच केली आहे.

चीन, पाकिस्तानने घेतला धसका, भारताला मिळणार ‘सोनोबॉय’, समुद्रातील शत्रूला रोखण्यास भारताची मोठी डिल
sonobuoys
Follow us
| Updated on: Sep 12, 2024 | 1:21 PM

भारतीय नौसेनेला मोठी शक्ती मिळाली आहे. आयएनएस मालप आणि आयएनएस मुल्की या पाणबुडी नाशक युद्धनौका यापूर्वीच भारतीय नौदलात दाखल झाल्या. त्यानंतर आता लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे. अमेरिका भारताला हाय अल्टिट्यूड अँटी-सबमरीन वॉरफेअर (HAASW) ‘सोनोबॉय’ पुरवणार आहे. यासाठी $52.8 दशलक्ष किमतीचा करार दोन्ही देशांमध्ये करण्यात आला आहे. सोनोबॉयची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते पाणबुडी, युद्धनौका आणि हेलिकॉप्टरमधून प्रक्षेपित केले जाऊ शकते. समुद्रातील शूत्रची सर्व माहिती सोनोबॉय देणार आहे. त्यामुळे नौदल नेहमी अपडेट मिळत राहणार आहे.

तीन फूट लांब सोनोबॉयची सोनार प्रणाली हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. त्याच्या मदतीने ते पाण्याच्या खोलीत असलेल्या शत्रूच्या पाणबुड्या शोधू शकतो. ही प्रणाली दोन प्रकारे कार्य करते. नौदल गरजेनुसार त्याचा वापर करू शकणार आहे. भारताला मिळालेले सोनोबॉय म्हणजे चीनसाठी मोठा धक्का आहे. कारण चीनने नुकतीच आपली अत्याधुनिक पाणबुडी लाँच केली आहे.

काय आहे सोनोबॉय?

सोनोबॉय म्हणजे हे एक प्रकारचे यंत्र आहे. ज्याचा वापर समुद्राच्या खोलीत पाणबुड्यांमधून होणाऱ्या ध्वनी लहरी शोधण्यासाठी केला जातो. त्यामुळेच याचा वापर पाणबुडीविरोधी युद्ध म्हणून केला जातो. समुद्राच्या पाण्याच्या खोलीत त्याचा उपयोग होतो. त्याची सोनार प्रणाली म्हणजे साउंड नेव्हिगेशन आणि रेंजिंग सिस्टमवर आधारित आहे. त्याद्वारे दूरवरून कोणत्याही वस्तूची माहिती, त्या वस्तूचे स्थान, अंतर आणि दिशा मिळते. त्यासाठी ध्वनिलहरींची मदत घेतली जाते.

हे सुद्धा वाचा

सोनोबॉय दोन्ही मोडमध्ये करणार काम?

सोनोबॉय दोन प्रकारे काम करते. सक्रिय आणि निष्क्रिय. निष्क्रिया मोडमध्ये त्याचा वापर करताना वस्तूचे अंतर आणि दिशा शोधली जाते. तर सक्रिय मोड म्हणजे समोरून येणाऱ्या ध्वनी लहरी शोधणे आहे. त्यात पाणबुडी किंवा इतर वस्तू शोधल्या जातात.

सोनोबॉय पाणबुडी, हेलिकॉप्टर आणि युद्धनौकांमधून सोडला जाऊ शकतो. याद्वारे भारतीय नौदलाची पाणबुडीविरोधी युद्ध करण्याची क्षमता सुधारणार आहे. सोनोबॉय ध्वनिक सेन्सर्सने सुसज्ज आहे. त्याच्या मदतीने भारतीय नौदलाला समुद्राच्या आत असलेल्या शत्रूच्या पाणबुड्यांचा हलका आवाजही अधिक चांगल्या पद्धतीने ऐकू येईल.

चीन, पाकिस्तानला झटका

सोनोबॉयमुळे चीन आणि पाकिस्तानला धक्का बसला आहे. यामुळे समुद्रातील भारताची टेहाळणी आणखी मजबूत होईल. शत्रूच्या पाणबुड्या किंवा कोणत्याही हालचालींना आळा घालण्यास मदत होईल. विशेषतः चीनसाठी हा मोठा धक्का आहे. अलीकडेच आपली अत्याधुनिक पाणबुडी लाँच केली आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.