AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Covid : गर्दीच्या ठिकाणी काय कराल? बूस्टर डोस घ्यावा की नाही, चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढताच नवे नियम जारी

गर्दीच्या ठिकाणी असताना किंवा बाहेर जाताना मास्कचा वापर करावा असे नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितले. चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर नवे नियम जारी करण्यात आले आहेत.

Covid : गर्दीच्या ठिकाणी काय कराल? बूस्टर डोस घ्यावा की नाही, चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढताच नवे नियम जारी
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 5:33 PM

नवी दिल्ली – दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जग ढवळून काढणारा कोरोनाच्या विषाणूमुळे (corona in china) चीनमध्ये पुन्हा उद्रेक झाला असून त्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने नवी मार्गदर्शक (advisory) तत्वे जारी केली आहेत. चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढू लागल्याने भारतात त्याचा उद्रेक होऊ नये यासाठी आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची (union health ministry meeting) महत्वाची बैठक पार पडली.

त्यानंतर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी, घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे नमूद केले. मात्र बाहेर जाताना, तसेच गर्दीच्या ठिकाणी (आत किंवा बाहेर) मास्क जरूर घालावा. तसेच कोरोनाचा प्रसार रोखता यावा यासाठी ज्या व्यक्तींनी आत्तापर्यंत बूस्टर डोस घेतलेला नाही, त्यांनी तो लगेच घ्यावा, असेही डॉ. पॉल यांनी सांगितले.

घरात अथवा घराबाहेर गर्दीत असाल तर मास्कचा वापर करणे आवश्यक आहे, असे डॉ. पॉल यांनी सांगितले. विशेषत: वृद्ध व्यक्तींनी मास्कचा वापर जरूर करावा. आतापर्यंत केवळ 27 ते 28 टक्के लोकांनी बूस्टर डोस घेतला आहे, मात्र हा आकडा वाढवायचा आहे. इतर लोकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी हा डोस घ्यावा, असे आवाहनही डॉ. पॉल यांनी केले. देशातील सर्व नागरिकांनी बूस्टर डोस घेणे अनिवार्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा

बैठकीतील महत्वाचे मुद्दे –

– देखरेख वाढवली जाईल

– (कोविड) चाचण्यांची संख्या वाढवण्यात येईल

– लसीकरणाची व्याप्ती वाढवली जाईल

– नववर्ष (सेलिब्रेशन) आणि सणांवर कोणतेही बंधन नाही

– दर आठवड्याला एक बैठक होईल

सरकारच्या सांगण्यासनुसार, सप्टेंबर महिन्यात जीनोम सर्व्हिलन्समध्ये BF.7 हा व्हेरिएंट तीन वेळा आढळला. आता राज्यांना मास्क संदर्भात आदेश लागू करावे लागतील.

दर आठवड्याला होणार बैठक

चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्रलयाची महत्वाची बैठक पार पडली. देशभरात आता देखरेख वाढवण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले. मात्र, नाताळ, नववर्ष आणि सणांवर कोणतेही बंधन नसल्याचेही नमूद करण्यात आले. या विषयावर सरकार आता दर आठवड्याला बैठक घेईल आणि परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार मार्गदर्श सूचना जारी करेल, असेही त्यांनी सांगितले.

पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.