Mahakumbh Stampede : महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं भाविकांना महत्त्वाच आवाहन
Mahakumbh Stampede : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यातील आज महत्त्वाचा दिवस आहे. आज मौनी अमावस्या आहे. शाही स्नानाचा दिवस असल्याने कोट्यवधी भाविक गंगा किनारी पोहोचले आहेत. यावेळी एक दुर्देवी घटना घडली. चेंगराचेंगरी होऊन 17 भाविकांचा मृत्यू झालाय.
![Mahakumbh Stampede : महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं भाविकांना महत्त्वाच आवाहन Mahakumbh Stampede : महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं भाविकांना महत्त्वाच आवाहन](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Yogi-Adityanath.jpg?w=1280)
आज मौनी अमावस्या आणि शाही स्नानाचा दिवस. त्यासाठी उत्तर प्रदेश प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात प्रचंड गर्दी झाली आहे. गंगा किनारी प्रयागराजमधील घाटांवर आज काही कोटी भाविक शाही स्नान करतील असा अंदाज आहे. आज पहाटे महाकुंभ मेळ्यात प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. यात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना स्नानासाठी संगम नोजवर जाऊ नका असं आवाहन केलं आहे. त्याऐवजी गंगा किनारी असलेल्या अन्य घाटांवर शाही स्नान करण्याचं अपील केलं आहे. त्रिवेणी संगम येथे ही चेंगराचेंगरी झाली.
मौनी अमावस्या असल्याने बुधवारी पहाटेच्या सुमारास त्रिवेणी संगमाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर शाही स्नानासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी ही चेंगराचेंगरी झाली. “मौनी अमावस्येला भाविकांना शाही स्नान करता यावं, यासाठी प्रशासनाने अन्य घाट बांधले आहेत, तिथे स्नान करा” असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना केलं आहे. प्रशासनाकडून सध्या संगम नोज येथे बचाव कार्य सुरु आहे.
योगी आदित्यनाथ काय म्हणाले?
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये योगी आदित्यनाथ यांनी लोकांना प्रशासनाच्या सूचनांच पालन करण्याच आवाहन केलं आहे. “कुठल्याही अफवांकडे लक्ष देऊ नका तसच सहकार्य करण्याच आवाहन केलय. अन्य घाटांवर अत्यंत शांततेत भाविकांच स्नान सुरु आहे” असं योगी म्हणाले. महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तासाभरात दोनवेळा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. मोदी स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी स्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. केंद्राकडून पूर्ण सहकार्याच आश्वासन दिलं.
महाकुम्भ-2025, प्रयागराज आए प्रिय श्रद्धालुओं,
माँ गंगा के जिस घाट के आप समीप हैं, वहीं स्नान करें, संगम नोज की ओर जाने का प्रयास न करें।
आप सभी प्रशासन के निर्देशों का अनुपालन करें, व्यवस्था बनाने में सहयोग करें।
संगम के सभी घाटों पर शांतिपूर्वक स्नान हो रहा है। किसी भी अफवाह…
— Yogi Adityanath (@myogiadityanath) January 29, 2025
अखिल भारतीय अखाडा परिषदेची भूमिका काय?
संगम नोज येथे मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. जखमींना मेला ग्राऊंड येथे उभारण्यात आलेल्या केंद्रीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलय. “चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे साधू-ऋषींनी सध्यासाठी मौनी अमावस्येच अमृत स्नान रद्द केलय” अशी माहिती अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली.