लखनौ : लखीमपूरच्या शेतकऱ्यांना भेटायला निघालेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रात्री उशिरा प्रियांका लखौनाला पोहोचल्या. तिथून त्या लखीमपूरला पडत्या पावसात रवाना झाल्या. दरम्यान, साडे आज पहाटे (सोमवारी ) 5.30 च्या सुमारास उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधींना हरगाव पोलीस स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले आहे.
प्रियांका गांधींना सीतापूर जिल्ह्यातील एका गेस्ट हाऊसमध्ये नेण्यात आले आहे. यूपी काँग्रेसने ट्विट करुन लोकांना समर्थनासाठी या भागात पोहोचण्यास सांगितले आहे. प्रियांका गांधींना ताब्यात घेऊन पोलीस त्यांना सीतापूर जिल्ह्यातल्या सिंधोली येथे घेऊन गेले आहेत, तिथे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहेत.
याअगोदर लखनौवरुन लखीमपूरला जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट पाहायला मिळाली. पोलिसांनी प्रियांका गांधींना रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण त्या लखीमपूरला जाण्यावर ठाम होत्या. त्यांना पोलिसांना गुंगारा देऊन काही अंतर पायी चालल्या आणि नंतर गाडीत बसून लखीपूरच्या दिशेने रवाना झाल्या.
श्रीमती @priyankagandhi जी को हरगांव से गिरफ्तार करके सीतापुर पुलिस लाइन ले जाया जा रहा हूं, कृपया सभी लोग पहुंचे। pic.twitter.com/d0GClYamvr
— UP Congress (@INCUttarPradesh) October 3, 2021
प्रियांका गांधी यांच्याबरोबर काही काँग्रेस कार्यकर्ते देखील लखीमपूरला रवाना झाले आहेत. जागोजागी पोलिसांचा मोठा फौजफाटा बघायला मिळतोय. यादरम्यान, अनेक ठिकाणी पोलिस काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवत आहेत. लथीमपूरला जाण्यापासून रोखत आहेत. मात्र काँग्रेस कार्यकर्ते लखीमपूरवाल जाण्यावर ठाम आहेत, अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळतीय.
टोलनाक्यावरुन काँग्रेस नेत्यांच्या गाड्या पुढे जाणार नाहीत, याची पूरेपूर काळजी पोलिसांनी घेतली होती. पण प्रियांका गांधी यांनी पोलिसांना चकवा दिला. पोलिसांनी टोलनाक्याच्या आसपास अनेक गाड्या चेक केल्या. पण प्रियांका गांधींनी पोलिसांना चकवा दिला.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि काही कार्यकर्ते दोन तीन गाड्यातून गेले. ज्या मार्गावर ते होते त्याच मार्गावर कृषी कायद्यांच्याविरोधात काही शेतकरी आंदोलन करत होते. भाजप कार्यकर्ते आणि आंदोलक यांच्या काही तरी बाचाबाची झाली आणि मग गृहराज्य मंत्र्यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावरच थेट गाडी घातल्याचा आरोप केला गेलाय.
केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचं मूळ गाव बनवीरपूर गावात ही घटना घडली. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी गावात येणार होते. त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी जमलेल्या शेतकरी आंदोलकांवर दोन मोटारी घुसवल्यानंतर हिंसाचार घडला. आंदोलकांनी या दोन मोटारींना आग लावल्याचाही आरोप करण्यात येत आहे. या घटनेत चार शेतकरी आणि इतर चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी एका मोटारीत आशिष मिश्रा हा मंत्रीपुत्र होता, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र मंत्रीमहोदयांनी हा आरोप फेटाळला आहे. या घटनेत भाजपच्या तीन कार्यकर्त्यांचा आणि एका वाहन चालकाचा मृत्यू झाला आहे, असं मिश्रा यांनी सांगितलं.
#WATCH | “They were miscreants among the farmers. Since the beginning of the farmers’ agitation, many terror outfits including Babbar Khalsa are trying to create chaotic situation. This incident was a result of the same,” says MoS Home Ajay Mishra Teni
(Source: Self-made video) pic.twitter.com/6CTpz4M49f
— ANI (@ANI) October 3, 2021
आंदोलक शेतकऱ्यांनीच आधी दगडफेक केली आणि त्यातूनच मग वाद वाढत गेला. ह्या घटनेनंतर आंदोलकांनी भाजप नेत्यांच्या गाड्यांची जाळपोळ केली. आधी आंदोलकांनी दगडफेक केली की आधी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांवर गाडी घातली यावर आरोप प्रत्यारोप आता सुरु झालेत. पण ह्या घटनेमुळे योगी सरकार संकटात असल्याचं दिसतंय.
(Uttar Pradesh Congress Priyanka gandhi Detained hargaon After defying house Arrest to visit Lakhimpur kheri live update)
हे ही वाचा :
इकडं चर्चा स्टारकिडच्या ड्रग्जकांडाची, तिकडे केंद्रीय मंत्रीपुत्राची, 8 जणांचा मृत्यू, 4 शेतकरी