UP Elections 2022: काँग्रेस कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही, सर्व जागा स्वबळावर लढणार- प्रियांका गांधी
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कोणत्याही पक्षासोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस सर्व जागांवर एकटीच लढणार असल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कोणत्याही पक्षासोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस सर्व जागांवर एकटीच लढणार असल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या. जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे, तसतशी त्यांनी संघटना मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. प्रियंका गांधी यांनी याची सुरुवात सोमवारी बुलंदशहरपासून केली. प्रियांका म्हणाल्या की, तीन महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी न घाबरता संघटना मजबूत करण्याचे काम सुरू केले पाहिजे. त्यांनी कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन आणी शोशल मिडीयावरूनही पक्षाचा संकल्प लोकांपर्यंत पोहचवायला सांगितले.
Many party workers asked me not to forge alliance with any party for the upcoming Assembly election. I want to assure all of you that we will fight on all the seats and we will fight alone: Congress General Secretary Priyanka Gandhi Vadra in Bulandshahr pic.twitter.com/Za3mwIWKDZ
— ANI UP (@ANINewsUP) November 14, 2021
“भाजपला स्वातंत्र्याचे महत्त्व कळत नाही”
काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रियंका यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला नाही, ते स्वातंत्र्याचा आदरही करू शकत नाहीत. त्यामुळेच त्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व कळत नाही.
काँग्रेसने येत्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 40 टक्के जागांवर तिकिटे महिलांना देणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रियांका यांनी सोमवारी बुलंदशहर प्रचारात विरोधी पक्ष सपा आणि बसपावरही हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या हे दोघेही यूपीमध्ये तळागाळात निवडणूक लढवत नाहीत. तळागाळात फक्त काँग्रेसच निवडणूक लढवणार आहे. यासोबतच त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कामाचेही कौतुक केले. उन्नाव, लखीमपूर खेरी आणि हाथरसच्या घटनांवेळी सपा आणि बसपा कुठे होते, असा सवालही त्यांनी केला.
हे ही वाचा-